कचरा गोळा करणारी निघाली वॉन्टेड चोर!  sakal
महाराष्ट्र बातम्या

कचरा गोळा करणारी ‘जयश्री’ निघाली वॉन्टेड चोर! चार राज्यात घरफोडीचे २० गुन्हे

कचरा गोळा करण्याच्या बहाण्याने ती घरात कोणी नसल्याचा अंदाज घ्यायची आणि त्याठिकाणी चोरी करून पसार होत होती. शहर गुन्हे शाखेने तिला जेरबंद केले असून तिच्याकडून चार घरफोडीतील दहा लाख ६१ हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : कलबुर्गीतून मुंबईतील कुर्ल्याला राहणारी जयश्री कन्वर उपाध्याय ही महिला वाणी प्रताप काळे या नावाने सोलापुरात वावरायची. कचरा गोळा करण्याच्या बहाण्याने ती घरात कोणी नसल्याचा अंदाज घ्यायची आणि त्याठिकाणी चोरी करून पसार होत होती. शहर गुन्हे शाखेने तिला जेरबंद केले असून तिच्याकडून चार घरफोडीतील दहा लाख ६१ हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

शहरात मागील काही दिवसांपासून दिवसा घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. त्याअनुषंगाने शहर गुन्हे शाखेने चोरट्याचा शोध सुरु केला. चोरी झालेल्या परिसरातून पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज संकलित केले. तसेच घरफोडीच्या पध्दतीवरून रेकॉर्डवरील चोरट्यांवरही पोलिसांनी वॉच ठेवला. त्यावेळी विजापूर नाका व एमआयडीसी परिसरातील चार ठिकाणी घरफोडी झालेल्या घराजवळ एक महिला कचरा गोळा करीत असल्याचे साम्य पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरु केला. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षिरसागर यांनी त्यांच्या पथकासह कलबुर्गी व मुंबईतील कुर्ला याठिकाणाहून त्या महिलेबद्दल अधिक माहिती संकलित केली. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र, अशा चार राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये जयश्री उपाध्याय या महिलेविरूध्द घरफोडीचे तब्बल २० गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी तिला १३ ऑगस्ट रोजी जेरबंद केले आणि चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक क्षिरसागर व संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली महेश शिंदे, राजू मुदगल, कृष्णात कोळी, कुमार शेळके, निलोफर तांबोळी, ज्योती लंगोटे, रत्ना सोनवणे, विजय वाळके, अमित रावडे, सचिन होटकर, गणेश शिंदे, श्रीकांत पवार, राहुल तोगे, बाळु काळे, वसिम शेख, प्रकाश गायकवाड, सतिश काटे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, दिलीप किर्दक यांच्या पथकाने पार पार पाडली.

...अन्‌ पोलिसही झाले थक्क

कचरा गोळा करणारी गरीब महिला काहीतरी अडचणीमुळे चोरी करीत असेल, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. पण, जयश्री कन्वर उपाध्याय उर्फ वाणी प्रताप काळे या महिलेची कुंडली पोलिसांन काढली. त्यावेळी पोलिसही थक्क झाले. डिसेंबर २०२१ मध्ये भंडारा पोलिसांनी तिला पकडल्यावर तिने स्वत:चे नाव वाणी काळे असे सांगितले होते. त्यावेळी ती भंडारा पोलिसांच्या कस्टडीतून पसार झाली होती. भंडाऱ्यात तिच्याविरूध्द दोन गुन्हे आहेत. तसेच कर्नाटकातील गुन्ह्यात न्यायालयाने तिल दोनवेळा एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT