Gas Cylinder sakal
महाराष्ट्र बातम्या

Gas Rate Hike : सिलिंडरमुळे सर्वसामान्य ‘गॅस’वर; वर्षभरात 22.5 टक्के दरवाढ

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : कोरोना संकट नियंत्रणात आल्यानंतर सातत्याने इंधन दरवाढ होत असून, त्याचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलचे दर काही प्रमाणात स्थिर आहेत. मात्र, सिलिंडर दरवाढीचा भडका सुरूच आहे. मार्च २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान घरगुती वापराचा सिलिंडर सुमारे २२.५ टक्क्यांनी (२०३ रुपयांनी) महागला आहे.

एक मार्च २०२२ ला घरगुती वापराचा १४ किलोचा सिलिंडर ९०२ रुपयांना होता. एक एप्रिलला तो एक हजार १०५ रुपयांना झाला. त्यामुळे भविष्यात ही किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान मात्र हे दर स्थिर होते.

दरात एकदाच घट

गेल्या १३ महिन्यांत घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात १० वेळा बदल झाले आहेत. यात एकदाच घरगुती गॅसचे दर कमी झाले. जेव्हा-जेव्हा किमतीत बदल झाले तेव्हा दर ५० रुपयांच्या घरात वाढले आहेत. त्यामुळे दिलासा मिळण्याऐवजी सर्वसामान्यांची प्रत्येकवेळी निराशाच झाली आहे.

आपल्या देशात पुरेशा प्रमाणात गॅसचे उत्पादन होत नाही. त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात तो आयात करतो. या गॅसचा दर आंतरराष्ट्रीय मार्केटवर आधारित आहे. स्थानिक पातळीवर त्याची किंमत ठरवली जात नाही. त्यामुळे दर किती असावे, हे आपल्या हातात नाही; मात्र सिलिंडरची किंमत गरिबांना परवडणारी असावी, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. सध्या सिलिंडरचे दर स्थिर आहेत.

- उषा पूनावाला, अध्यक्षा,

ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्युशन फेडरेशन, महाराष्ट्र राज्य

गेल्या काही महिन्यांपासून वीजबिलात वाढ झाली. आता गॅस सिलिंडर महाग झाल्याने कुटुंबाचा आर्थिक ताण वाढला आहे. गॅसचे अनुदानही बंद आहे. आता सिलिंडर वेळेत मिळू लागले, पण दरवाढीवर नियंत्रण हवे आहे. सरकारने याबाबत विचार करण्याची गरज आहे. विशेषतः ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत.

- अर्चना जाधव, गृहिणी, अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT