gautami patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil : 'तू म्हणशील तसं!' गौतमी पाटीलला लग्नाची मागणी; बीडच्या शेतकरी पुत्राचं थेट पत्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः नृत्यांगणा गौतमी पाटील हिने मागे लग्नाबद्दलच्या अपेक्षा एका मुलाखतीतून सांगितल्या होत्या. त्या मुलाखतीचा दाखला देत बीडच्या एका शेतकरी पुत्राने गौतमीच्या सगळ्या अटी मान्य करत लग्नाची मागणी घातली आहे. विशेष म्हणजे त्याने त्याच्या घराचा पत्तादेखील दिलाय.

महाराष्ट्रात सध्या एकच नाव चर्चेत आहे. ते म्हणजे गौतमी पाटील. तिच्या प्रत्येक कृतीवर आणि विधानावर सर्वांचंच लक्ष असतं. मागे तिने एकदा लग्नाबद्दल सांगितलं होतं. संसार थाटण्याचा विचार असून योग्य आणि समजून घेणारा जोडीदार पाहिजे, असं ती म्हणालेली.

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला थेट लग्नाची मागणी घातली आहे. पत्रामध्ये त्याने, तुझ्या इच्छा-अटी सगळ्या मान्य, बोल तू होती का माझी परी? असं म्हटलं आहे.

'तू जशी आहेस तशी मला आवडली आहेत. तुझ्यासोबत कुणी लग्न करत नसेल तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मी एक शेतकरी पुत्र असून शेती, दूध सगळं संपन्न आहे. तुझी तयारी असेल तर भेटायला ये' असं पत्रामध्ये रोहन गलांडे पाटील याने म्हटलंय.

गौतमीने अश्लील हावभाव करु नये- ठाकरे

पाटील आडनावाला आमचा विरोध नाही, फक्त तिने अश्लील हावभाव करू नये, असं मराठा महासंघाच्या नेत्या अनुराधा ठाकरे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून गौतमीच्या पाटील आडनावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पण गौतमी आपल्या आडनावावर ठाम आहे. ठाकरे या जालन्यात बोलत होत्या. पाटील ही पदवी आहे. अनेक समाजात पाटील हे आडनाव लावलं जातं. पाटील हे आडनाव कुणाचीही मक्तेदारी नाही. त्यामुळे गौतमीच्या पाटील आडनावाला आमचा विरोध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT