Gautami Patil  SAKAL
महाराष्ट्र बातम्या

Gautami : पाटलांच्या बैलगाड्याचा पुरता राडा! गौतमीचा कार्यक्रम ठेवल्याने विरारच्या पाटलांवर गुन्हा दाखल

अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी आयोजक प्रभाकर पाटलांवर गुन्हा दाखल

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

नालासोपारा : गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे आयोजकास भोवलं आहे. परवानगीच्या अटी शर्थीचा भंग केल्याप्रकरणी भादंवी कलम 188 अन्वेय आयोजक प्रभाकर पाटील यांच्यावर विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की नुसती चर्चा असते. विरारच्या खार्डी गावचे प्रभाकर पाटील यांनी घरच्या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त 25 मे रोजी आपल्या घराच्या समोरील मैदानात गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची प्रभाकर पाटील यांनी रीतसर परवानगी ही घेतली होती. रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार होता. मात्र गौतमी पाटीलच रात्री साडे आठच्या नंतर आली आणि 9 वाजता कार्यक्रम सुरू झाला.

पालघर जिल्ह्यात गौतमी पहिल्यांदाच आली असल्याने तिच्या चाहत्यांची तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे तिच्या डान्स पाहात रात्रीचे 11 कधी वाजले हे चाहते आणि आयोजकांना कळलेच नाही. 10 च्या नंतर पोलिसांनी दोन वेळा कार्यक्रम बंद करण्याची विनंती ही केली पण एक गाणं होऊद्या, एक गाणं होऊद्या म्हणत 10 नंतर पुन्हा तीन गाणे झाले आणि गौतमीचा कार्यक्रम संपला.

गौतमीचा डान्स पाहण्यासाठी माजी खा. बळीराम जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक सदानंद पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी हजेरी लावली होती. वेळेचे बंधन असतानाही चाहत्यांचा आग्रहमुळे कार्यक्रम लांबत गेला आणि पोलिसांनी मात्र आयोजकाला कायद्याच्या कचाट्यात अडकवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले पोलिस?

आम्ही अटी शर्ती ठेवून गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. 10 ची वेळ संपली असताना आम्ही कार्यक्रम बंद करत होतो. पण आमचे न ऐकता पुन्हा कार्यक्रम सुरू ठेवला. त्यामुळे लोकसेवकाने अटी शर्तीच्या नियमानुसार परवानगी दिल्याचा भंग केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मांडवी पोलीस ठाणे प्रफुल वाघ यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT