Gautami Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil : 'अरे थांबा रे!' गौतमी पाटीलचे चाहते चक्क स्टेजवरच चढले; कार्यक्रमात दगडफेक

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात होणारी गर्दी हे काही नवीन नाही. पण आता जरा जास्तच झालं.

सकाळ डिजिटल टीम

गौतमी पाटील हे नाव आता घराघरात पोहोचलं आहे. तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दीही नवीन नाही, मात्र तिच्या एका कार्यक्रमादरम्यान एवढी गर्दी झाली, की चाहते नियंत्रणाबाहेर गेले आणि त्यांनी राडा केला.

बीडमध्ये गौतमीचा डान्सचा कार्यक्रम होता. राजुरी इथल्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीचा डान्स पाहायला लोकांनी इतकी गर्दी केली की अक्षरशः रंगाचा बेरंग झाला.

गौतमीचे चाहते इतके अनियंत्रित झाले की शेकडो लोक थेट गौतमी नाचत असलेल्या स्टेजवरच चढले. बरं एवढंच नाही, तर या वेळी स्टेजवर दगडफेकही करण्यात आली. यामुळे आता गौतमी पाटील पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याच्या आरोपामुळे गौतमी पाटील चर्चेत आली होती. पण तरीही तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. तिच्या डान्सच्या व्हिडीओ क्लिपही व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी तिच्या एका कार्यक्रमात एका शाळेचा छत तुटलं होतं, तसंच एकाचा मृत्यूही झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Price Today: दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर स्वस्त की महाग? पुणे, मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील दर जाणून घ्या

Edible Oil Price Hike India : स्वयंपाकघराचे बजेट कोलमडणार! सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ होणार? पाम, सोयाबीन, मोहरी तेल महागण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांना विमानतळावर ३ तास थांबवलं, निघताना ५० हजार दंड केल्याचा आरोप; केंद्राने परदेशात जायला नाकारलेली परवानगी

Mumbai Fire : साकीनाक्यात भीषण आग! भंगार गोदाम जळून खाक, दोघांचा होरपळून मृत्यू; चौघे गंभीर

बॉबी देओलला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी! 'आश्रम ४'च्या शूटिंगचं ठिकाणच बदललं?

SCROLL FOR NEXT