Gautami Patil  SAKAL
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil : पाटील आडनाव लावणार की नाही? गौतमीनं एका झटक्यात विषय संपवला; म्हणाली...

सकाळ डिजिटल टीम

Gautami Patil Surname new controversy viral social media : महाराष्ट्रात सध्या गौतमी पाटीलची चलती आहे. तिच्या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी होते. त्यामुळे तिच्यावर टीका केली जाते. आता तिने 'पाटील' आडनाव लावू नये, असा इशारा तिला देण्यात आला आहे. शिवाय त्यासंबंधीची एक बैठक पुण्यात झाली.

गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार असल्याचं समोर येत याहे. त्यामुळे पाटील हे आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय, असा तिच्यावर आरोप आहे. तिने पाटील आडनाव लावू नये, अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयक राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता गौतमी काय उत्तर देणार, हे पाहाणं औचित्याचं होतं.

शेवटी सायंकाळी गौतमीने प्रतिक्रिया दिलीच. ती म्हणाली, कोण काय बोलतंय याने मला काही फरक पडत नाही. मी माझं काम करत राहणार आहे. मी पाटील आहे आणि पाटीलच नाव लावणार.

महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही, या राजेंद्र पाटील यांच्या इशाऱ्यावर बोलताना ती म्हणाली, आता कोण काय बोलतंय याने मला फरक पडत नाही. कोणाला माझ्या कार्यक्रमाविषयी काही प्रश्न असतील तर त्यांनी माझ्या कार्यक्रमाला यावं आणि संपूर्ण कार्यक्रम पाहावा, असं आवाहन तिने बोलतांना केलं.

ज्या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतो तिथे हुल्लबाजी झाली नाही असे होत नाही. शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवून देखील तरुणाईचा होणारा राडा हा सोशल मीडियावर व्हायरल होतो. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील गावकऱ्यांनी गौतमीचा कार्यक्रम असल्यास कडक धोरण अवलंबले आहे. ते म्हणजे तिचा कार्यक्रम गावात होऊ न देणे, ज्या गावात गौतमीचा कार्यक्रम असल्यास पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे, असे नियम काढले आहेत. दरम्यान, आता गौतमीच्या आडनावावरुन वादंग पेटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Marathi Live Updates : मुंबई-पुण्यात मुसळधार पाऊस; केतन अग्रवाल हत्या प्रकरणासह दिवसभरातील सर्व मोठे अपडेट्स

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

SCROLL FOR NEXT