महाराष्ट्र

गीता राष्ट्राचे प्रतीक नव्हे : डॉ. सुखदेव थोरात

सकाळवृत्तसेवा

जालना : देशाच्या मुख्य नेत्याने जपानमध्ये जाऊन संविधान भेट द्यावे की गीता? गीतेचा प्रचार जरूर करा, मात्र गीता राष्ट्राचे प्रतीक होऊ शकत नाही, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्‍त केले. 

जालना येथील पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह फुलंब्रीकर नाट्यगृहात दोनदिवसीय अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे शनिवारी (ता.27) उद्‌घाटन झाले. याप्रसंगी उद्‌घाटक म्हणून डॉ. थोरात बोलत होते. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष डी. बी. जगत्पुरिया, डॉ. श्रीपाल सबनीस, माजी मंत्री नितीन राऊत, डॉ. निवेदिता पानतावणे, स्वागताध्यक्ष डॉ. संजय लाखे आदींची उपस्थिती होती. 

या वेळी डॉ. थोरात म्हणाले, की संविधान बदल करण्याच्या भाजपकडून दुसऱ्यांदा हालचाली सुरू आहेत. त्यामुळे दलित, मागास समाजामध्ये असुरक्षित वातावरण आहे. गीतेचा प्रचार करण्यास विरोध नाही. शासन निर्णय काढून सर्व महाविद्यालयांना गीता विकत घेऊन प्रचार करावा. मराठी दलित साहित्याच्या हिंदी व इंग्रजी अनुवादामुळे देशाची सीमा दलित साहित्याने ओलांडली आहे. आता नवीन साहित्यिकांनी शिक्षण, खासगीकरण आदी आव्हानांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. युरोपमध्ये शिक्षण क्षेत्रात खासगीकरण नाही.

मात्र, भारतात शिक्षण क्षेत्राचे खासगीकरण करून दलित, मागास, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे या समाजातील मुलांची पात्रता कमी होऊन नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळत नाही. दुसरीकडे खासगीकरण करून आरक्षण संपुष्टात आणले आहे. शासनाने कंत्राटी भरतीवर भर देऊन नोकरीत आरक्षणाचा मुद्दाच बाजूला सारला आहे, असा आरोपी त्यांनी केला. अध्यक्ष . जगत्पुरिया म्हणाले की, सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे. तरीही जातिवाद का नष्ट होत नाही? धर्माच्या ठेकेदारामध्ये कोणतीही शक्ती नसते. ते अतिरेक करून भय निर्माण करतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT