Gautami Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil : ...नाहीतर मी 'मुसंडी' मारेन; गौतमी पाटीलला घनःश्याम दराडेचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

Gautami Patil News : नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना दिवसेंदिवस गर्दी वाढतांना दिसत आहे. तिच्या कार्यक्रमात गोंधळ, गदारोळ आणि गैरप्रकार होतांना दिसत आहेत. शिवाय अपघातही होत आहेत.

छोटा पुढारी घनःश्याम दराडे याने थेट गौतमीला इशारा दिला आहे. गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करु नये, नाहीतर मी मुसंडी मारेन असं त्याने म्हटलं आहे.

छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनःश्याम दराडे याचा मुसंडी नावाचा चित्रपट येत आहे. त्यानिमित्त तो आज पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेला होता. गौतमी पाटील ही लावणीला बदनाम करीत असल्याने दराडेने म्हटलंय.

घनश्याम म्हणाला की, गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करण्याचा प्रयत्न करु नये नसता आपण मुसंडी मारु. आपला आणि तिचा कोणताही वाद नाही परंतु ती लावणीला बदनाम करीत आहे. तिने आमचा मुसंडी चित्रपट घावा, असं आवाहन त्याने केलंय.

अजित पवारांवर बोलतांना घनःश्याम म्हणाला की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जसा शरद पवार यांचा आहे तसाच तो अजितदादांचाही आहे. अजितदादा कधीही शरद पवारांना सोडून जाणार नाहीत, असंही त्याने म्हटलं आहे.

दरम्यान, गौतमीवर घनःश्यामने टीका केल्याने सर्वत्र चर्चा होत आहेत. घनःश्यामचा मुसंडी चित्रपट येत आहे. त्याचं त्याने ज्या पद्धतीने प्रमोशन केल्याचं बोललं जातंय. आता गौतमी पाटील घनःश्यामच्या टीकेवर काय बोलणार, याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT