Girish Mahajan Attacks Uddhav Thackeray  sakal
महाराष्ट्र बातम्या

Girish Mahajan Attacks Uddhav Thackeray : हिंमत होती तर निवडणुकांआधी काँग्रेससोबत जायचं होतं ; उद्धव ठाकरेंवर महाजनांची टीका !

आता तुमच्यासोबत फक्त शिल्लक सेना उरली

सकाळ डिजिटल टीम

Girish Mahajan Attacks Uddhav Thackeray : नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा झाली. ते हिंदी भाषीकांशी बोलत होते. यावेळी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

शिवसेनेसोबतची साथ सोडून फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथ विधीवरुन यावेळी उद्धव ठाकरे बोलले आणि त्यांनी निशाणा साधला. या उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. (Latest Maharashtra Political News)

यावेळी ते म्हणाले कि, तुम्ही काँग्रेसमध्ये गेल्याचं सांगता जर तुमच्यात हिंमत होती तर निवडणुकांआधी काँग्रेससोबत जायचं होतं. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आलात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भाषण केले तेव्हा तुम्ही निवडून आलात. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही लोकसभेला उभे राहा आणि दोन खासदार निवडून आणून दाखवा, असंही यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

तुम्ही मोदींना हुकूमशहा म्हणता हुकूमशाही कशाला म्हणतात ते माहित आहे का? तुमच्या हुकूमशाहीमुळे 55 पैकी आठ-दहा आमदार सुद्धा राहिले नाहीत. आमदार आणि मंत्राने तुम्ही भेटला नाही म्हणून लोक तुमच्या सोबत राहिले नाहीत

तुम्ही कोरोना काळात मृतदेहांच्या लपेटणाऱ्या बॅगमध्ये आणि रेमडेसिवर इंजेक्शनमध्ये तुम्ही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. माझा परिवार म्हणत एक दिवस तरी बाहेर पडलात का? त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात गेले, दोन वेळा त्यांना कोरोना झाला. तरी एकही दिवस ते घरी बसले नाहीत.

आम्हीही रस्त्यावर होतो. तुम्ही त्यावेळी कुठे होता आज तुम्ही कुठल्या अधिकाराने विचारता? लोकांना सगळं माहित आहे. आता तुमच्यासोबत म्हणूनच फक्त शिल्लक सेना उरली आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केलीे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT