girish mahajan 
महाराष्ट्र बातम्या

एका ओळीचा काय? आम्ही पानभर अध्यादेश काढू, पण...; मराठा-कुणबी मुद्दावर महाजन यांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दावर जालना जिल्ह्यात सुरू असलेलं आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. मात्र सरकार मुळ मागणीसाठी वेळ लागत असल्याचं सांगत आहे. मात्र मनोज जरांगे पाटील अध्यादेशावर ठाम आहेत. या अध्यादेशाबाबत सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, एका ओळीचा अध्यादेश काय आम्ही पानभर अध्यादेश काढू. अध्यादेश हा विषय असा नाही की कॅबिनेट बैठक घेतली आणि विषय संपेल. मराठा आरक्षणासाठी आपण किती वर्षांपासून लढतोय आणि हे करताना आमच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळेस कसरत करुन आम्ही आरक्षण कोर्टात टिकवलं.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या दुर्लक्षामुळे आरक्षण टिकू शकलं नाही. हे सांगण्याचं तात्पर्य आहे की या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक, पॉझिटिव्ह आहे. मराठा समाजाची जी मागणी आहे, त्याला आमचं सरकारच न्याय देईल, असंही महाजन यांनी म्हटलं.

दरम्यान समिती नेमून तीन महिने झाले आहे. आणखी थोडा वेळ लागतोय. मराठा समाजाला न्याय मिळणार आहे. तरुणांना न्याय मिळणार आहे. मला वाटतं तीन महिने झाले म्हणून सर्व संपलेलं नाही. एक महिन्याची मुदत मुख्यमंत्र्यांनी आणि समितीने मागितली आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्याचं महाजन यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT