Nanded Crime esakal
महाराष्ट्र बातम्या

Nanded Crime : बाप अन् सख्खा भाऊच ठरले 'ती'चा 'काळ'; नात्यातील मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याने केली हत्या

सकाळ डिजिटल टीम

Nanded Crime: नांदेडमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीचे नात्यातल्या मुलाशी प्रेमसंबंध असल्यामुळे कुटुंबाकडून हत्या करण्यात आली आहे.

नराधम पिता आणि भावांकडून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली असून हत्येनंतर तब्बल तीन दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिपाल पिंप्री (ता.नांदेड) येथील बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी शुभांगी जोगदंड (वय २३) हिचे गावातीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. याची कुणकुण आई-वडिलांना लागली होती.

तीची समज काढण्याचाही प्रयत्न केला होता. दरम्यान आई-वडिलांनी तीचा विवाह इतरत्र जुळवला होता. तरीही ती त्या प्रियकरासोबतच फोनवर बोलतच होती.

आपली आता समाजामध्ये बदनामी होईल, याकारणाने आई-वडिलांनी शुभांगीचे मामा, काका व काकाच्या दोन मुलांना हाताशी घेऊन शुभांगीचा खून केला आणि तिला जाळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने राख इतरत्र फेकून दिली.

शुभांगी तीन दिवसांपासून बेपत्ता असून, ती नातेवाईकांकडेही नाही याची चर्चा पहिपाल पिंप्री गावात सुरु होती. गावातील काही नागरिकांनी गुरुवारी (ता.२६) लिंबगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पवार यांना माहिती दिली.

श्री. पवार यांनी गोपनीयपद्धतीने चौकशी केली असता, शुभांगीच्या आई-वडिलांनी मामा, काका व काकाच्या दोन मुलांच्या मदतीने शुभांगीचा खुन करून पुरावा नष्ट केल्याची बाब समोर आली आहे.

याप्रकरणी वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी आणि भाऊ कृष्णा, गोविंद या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

यांच्यावर लिंबगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून आई-वडिलांनी पोटच्या मुलीचा खून केल्याच्या या घटनेमुळे नांदेड शहर व परिसर सुन्न झाले आहे.

हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे गावामध्ये खळबळ माजली असून तेथील लोकं एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. पोलिसांनी कारवाई सुरू केली असून अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay swearing in CM : मुख्यमंत्री थलपती विजय, आई, वडिलांच्या डोळ्यात पाणी; साथीला राहुल गांधी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

Inspiring cab driver story : शाळेच्या व्हॅनपासून रात्रीच्या कॅबपर्यंत; पोरासाठी झटणाऱ्या या चालकाची हृदयस्पर्शी कहाणी

विराट विरुद्ध रोहित... रायपूर सज्ज!" मुंबई पलटवार करणार की बंगळूर विजयाच्या रुळावर परतणार?, हार्दिक खेळणार का?

IPL 2026: लखनौचा संघ चेन्नईलाही धक्का देणार?; ऋतुराज गायकवाडच्या संघासाठी प्लेऑफकरिता विजय आवश्यक, पहा कशी असेल Playing 11

स्मशानभूमीतील कपड्यांचा थाटला नवा घाणेरडा व्यवसाय, अहमदाबादला पोहोचत होते ‘ब्रँड न्यू’ बनून

SCROLL FOR NEXT