Tweet.jpg 
महाराष्ट्र बातम्या

मुजरा! मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय 'हा' टिकटाॅक व्हिडिओ; तुम्ही पाहिलात का? 

वृत्तसंस्था

मुंबई : सध्या महाराष्ट्रात एक टिकटाॅक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओचीच सगळीकडे क्रेझ दिसते आहे. सध्या सर्वांचेच व्हाॅट्सअप स्टेट्सला हा व्हिडिओ दिसत आहे.  

या व्हिडिओमधील तरुणी नऊवारी साडीमध्ये दिसत आहे. हा व्हि़डिओ तुफान शेअर होत आहे. आणि हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे 19 फेब्रुवारीला साजरी केली जाणारी शिवजयंती. या व्हिडिओमुळे शिवजयंती आधीच संपूर्ण वातावरण भगवंमय झाल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शिवजयंतीनिमित्त हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये एक तरुणी नऊवारी साडी नेसून, पारंपारिक अलंकार परिधान करून रस्त्यावरून चालत जाताना दाखवली आहे. येणारा प्रत्येकजण त्या मुलीसमोर मुजरा, हात जोडत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

सुरुवातीची काही सेकंद येणारा प्रत्येकजण जिजाऊंच्या लेकीसमोर मुजरा करत असल्याचं दिसतं. मात्र दुसऱ्याच क्षणाला कॅमेरा पुढे येतो आणि सर्वजण त्या तरुणीसमोर मुजरा का करतात याचा उलगडा होतो. त्या तरुणीच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असते. आणि येणारा जाणारा प्रत्येकजण त्या मूर्तीला बघून मुजरा करत असल्याचं कळतं.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कार पडली 15 फूट खाली

हा व्हिडिओ शिवप्रेमी सर्वाधिक शेअर करत आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने हा टिकटाॅक व्हिडिओ व्हाॅट्सअपवर सर्वाधिक शेअर केला जात आहे. या टिकटाॅक व्हिडिओवर शिवप्रेमींकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

शिवजंयतीनिमित्त शिवप्रेमी अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र यावेळेला महाराष्ट्रभर नऊवारी साडीतील या तरुणीचा टिकटाॅक व्हिडिओ प्रत्येकाच्याच व्हाॅट्सअपवर झळकत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT