Rape News  esakal
महाराष्ट्र बातम्या

मुलीच्या आई-वडिलांचा विवाहाला विरोध! तरुणाने अल्पवयीन मुलगीच पळविली, सोलापूर शहर पोलिसांनी पुण्यातून दोघांना पकडले, पण अल्पवयीन 4 महिन्यांची गरोदर

बिहार येथून रेल्वे ट्रॅकचे काम करायला कंत्राटी तत्त्वावर आलेल्या तरुणाने दुसऱ्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेले. विवाहासाठी मुलीच्या आई-वडिलांचा विरोध असल्याने तिला पळवून नेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सोलापूर शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बेपत्ता अल्पवयीन मुलीसह तरुणाला शोधून सोलापुरात आणले आहे. सच्चुकुमार चंद्रबन्सी असे त्या तरुणाचे नाव आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : बिहार येथून रेल्वे ट्रॅकचे काम करायला कंत्राटी तत्त्वावर आलेल्या तरुणाने दुसऱ्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेले. विवाहासाठी मुलीच्या आई-वडिलांचा विरोध असल्याने तिला पळवून नेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सोलापूर शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बेपत्ता अल्पवयीन मुलीसह तरुणाला शोधून सोलापुरात आणले आहे. सच्चुकुमार चंद्रबन्सी असे त्या तरुणाचे नाव आहे.

विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील होटगी नाका परिसरात अल्पवयीन मुलगी आई-वडिलांसह राहायला होती. संशयित आरोपी तरुण देखील त्यांच्या जवळच राहत होता. मुलीचे आई-वडील, संशयित आरोपी देखील रेल्वे ट्रॅकची कामे करतात. २५ सप्टेंबर २०२५ रोजी अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद तिच्या आई-वडिलांनी विजापूर नाका पोलिसांत दिली होती. विजापूर नाका पोलिसांनी त्यांना शोधले, पण सापडले नाहीत. १८ दिवसांपूर्वी हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अश्विनी काळे यांच्या नेतृत्वातील पथकाने अल्पवयीन मुलीचा व तिला पळवून नेणाऱ्या तरुणाचा शोध सुरू केला. त्यासाठी सायबर पोलिस ठाण्याकडील हवालदार श्री. गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांची मदत घेतली. त्यावेळी तो तरुण पुण्यातील चाकण भागात असल्याची माहिती मिळाली. मागील साडेचार महिन्यांपासून तो तरुण विविध ठिकाणी मिस्त्री म्हणून काम करीत होता.

पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह त्या तरुणाला विजापूर नाका पोलिसांच्या हवाली केले आहे. मुलीचे वय अजूनही १८ वर्षे पूर्ण नसून ती चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती वैद्यकीय तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. तरुणाविरुद्ध पोक्सोसह अन्य कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून विजापूर नाका पोलिस पुढील तपास करीत आहेत.

‘या’ पथकाची कामगिरी

वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अश्विनी काळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अलका शहापुरे, पोलिस हवालदार महादेव बंडगर, पोलिस नाईक अ. सत्तार पटेल, चालक दादा गोरे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT