महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांना एकदा तरी कर्जमाफी द्या - उद्धव

सकाळवृत्तसेवा

मुंबई - 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करेपर्यंत वाट कसली बघता? सरकारने सुरवातीपासूनच खबरदारी घेतली असती, तर शेतकऱ्यांवर ही वेळच आली नसती,'' अशा शब्दांत राज्य सरकारवर हल्ला चढवत 'एकदा तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,'' अशी जोरदार मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.

राज्यातील पेट्रोलचे वाढलेले दर, छत्तीसगडमध्ये झालेला नक्षलवाद्यांचा हल्ला यावरून मंगळवारी ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवत दिल्लीतील "डिनर डिप्लोमसी' अयशस्वी ठरल्याचे सूचित केले.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मित्रपक्षांना दिल्लीत बोलावून सहभोजनाचा घाट घातला. या सहभोजनात आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यावर शिवसेना शांत बसली होती; मात्र भाजपच्या या "डिनर डिप्लोमसी'चा फारसा उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले. "मातोश्री' या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी पुन्हा भाजपला लक्ष्य केले. राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची परिस्थिती आहे. कधी दुष्काळ, तर कधी पिकाला चांगला भाव नाही, अशा परिस्थितीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकदा तरी कर्जमुक्त करा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SL A: '...त्यामुळे भारतीय खेळाडू संतापले', सुपर ओव्हरमधील श्रीलंकेच्या 'माइंड गेम'वर अश्विन थेटच बोलला

Ananya Banerjee Controversy : नगरसेविकेच्या कार्यालयात कंडोमचा खच, मसाज मशीन्स अन् गुप्त मेकअप रूम; आतील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kartik Joshi : कार्तिक जोशीची कारगिल ते कन्याकुमारी ऐतिहासिक धाव, महाराष्ट्रात आगमन

Latest Marathi News Live Update : सरसकट कर्जमाफीसाठी वाशिममध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, दुचाकीही पेटवली

Vaibhav Sooryavanshi ला मॅच सोडून "घरी जा" असं का म्हटलं? इंडिया अ च्या सामन्यात अचानक का वाढला तणाव; जाणून घ्या काय घडलं

SCROLL FOR NEXT