Kishor-Tiwari 
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांनाही पॅकेज द्या! - किशोर तिवारी

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - भारत सरकारने गरिबांना, उद्योगांना, तसेच बॅंकांना सुमारे ४ लाख कोटींचे पॅकेज दिले. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला कमीत कमी चार लाख कोटींचे पॅकेज द्यावे. भारतातील ७० टक्के अन्नसुरक्षा पूर्ण करणाऱ्या खरीप हंगामासाठी एकात्मिक कार्यक्रम आखून मार्ग काढावा, अशी विनंती शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी केली.

शेतकरी व शेतमजूर पंतप्रधान व मुख्यमंत्रांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत आहेत. मात्र घरात पडलेला कापूस, शेतात उभे असलेले पीक, संत्रा, फळबागा, भाजीपाला याचे होत असलेले अपरिमित नुकसानीसाठी आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याची गरज असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे.

लॉकडाऊनच्या परिणामामुळे बागायती आणि भाजीपाला क्षेत्रातील प्रचंड नुकसान झाले आहे. पुरवठा साखळीत पूर्ण व्यत्यय व खरेदी केंद्रे व कृषी प्रक्रिया युनिट बंद असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगामी खरीप हंगामाच्या संपूर्ण परिणामाच्या गंभीर चिंतेवरही तिवारी यांनी प्रकाश टाकला आहे. भारतातील ७० टक्के अन्नपुरवठा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न खरीप हंगामावर अवलंबून असून, मार्च ते मे या कालावधीत खरीप बियाणे, खते, कीटकनाशके तयार करण्याचा निर्णायक काळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT