Global Teacher Disale Guruji pay back 35 months salary soalpur  Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी ब्रेकिंग! ग्लोबल टिचर डिसले गुरूजींचा राजीनामा

ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. ७ जुलैला त्यांनी राजीनामा दिला असून तो गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडेही आला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. ७ जुलैला त्यांनी राजीनामा दिला असून तो गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडेही आला आहे. राजीनामा अर्जात त्यांनी काहीच कारण नमूद केलेले नाही.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, दोन वर्षांत ते ‘डायट’कडे फिरकलेच नाहीत. त्यांनी ग्लोबल टिचर ॲवार्डची तयारी करण्यातच तो कालावधी घालवला, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आणि त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला. तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी चौकशी करून अहवाल तसाच ठेवला. विद्यमान शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी तो अहवाल पुन्हा उघडला आणि त्यांची स्वतंत्र चौकशी करून कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली. तत्पूर्वी, त्यांनी अमेरिकेत फेलोशिपला जाण्यासाठी रजा मागितली होती. पण, अपूर्ण कागदपत्रांमुळे त्यांचा अर्ज तसाच प्रलंबित ठेवला होता. कागदपत्रांची पूर्तता न करताच त्यांनी रजा मागितली होती. पण, त्यावेळी त्यांच्या रजेचा विषय तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांच्या आदेशाने डिसले गुरुजींना रजा मिळाली. त्याचवेळी त्यांनी शिक्षण विभागातील काहींनी माझ्याकडे पैसे मागितले, असा आरोपही केला होता. पण, त्यांना त्याचा पुराव्यानिशी खुलासा करण्याचे पत्र जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले. त्यावेळी त्यांनी माफीनामा दिला होता.

राजीनामा मागे घेण्यासाठी ३ महिन्यांची मुदत

क्युआर कोड शिक्षण प्रणाली विकसीत करणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना दोन वर्षांपूर्वी ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला. आता शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजींमध्ये यांच्यात कलगीतुरा निर्माण झाला आहे. त्यातूनच हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पण, राजीनामा मागे घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT