Disle Guruji Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

ग्लोबल टीचर म्हणाले, ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा; झेडपी ‘सीईओं’ना पत्र

चौकशीचा गोपनीय अहवाल समाजमाध्यमांपर्यंत पोचला कसा? शिवाय माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत ती गंभीर बाब आहे. माझी बदनामी करण्यासाठी अहवाल लीक करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्लोबल टीचर डिसले गुरुजींनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पाच सदस्यीय समितीने सखोल चौकशी केल्यानंतर त्याचा स्वतंत्र अहवाल तयार झाला. तो चौकशीचा गोपनीय अहवाल (दस्तऐवज) समाजमाध्यमांपर्यंत पोचला कसा? शिवाय माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत ती गंभीर बाब आहे. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी अहवाल लीक करणाऱ्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्लोबल टीचर डिसले गुरुजींनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे.

तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी नेमलेल्या समितीने रणजितसिंह डिसले गुरुजींची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर प्रतिनियुक्ती असतानाही ते तिकडे गेले नसल्याबद्दल चौकशी केली होती. त्यानंतर पुन्हा विद्यमान शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमून पुन्हा चौकशी केली. त्या समितीच्या मागणीनुसार डिसले गुरुजी यांनी खुलासा दिला. त्याचवेळी त्यांनी दोनवेळा अर्ज करून चौकशी समितीच्या अहवालाची मागणी केली होती. त्यांना तो अद्याप दिला गेला नाही. हाच धागा पकडून डिसलेंनी सीईओंना लिहिलेल्या पत्रात ती खंत मांडली आहे. गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी डिसलेंनी पत्रातून केली आहे.

८ ऑगस्टला राजीनाम्याचा निर्णय

ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी ७ जुलैला आपला राजीनामा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिला आहे. महिन्यांत त्याना राजीनामा मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेता येऊ शकतो. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही ते डिसले गुरुजी राजीनाम्यावर ठाम आहेत. पण, त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नामंजूर, ते स्वत:हून राजीनामा मागे घेतील का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावर ८ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन अंतिम निर्णय घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: तुकाराम मुंढेचा कारवाईचा धडाका! दिशाभूल करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त, १५ हून अधिक उत्पादनांवर बंदी

Gold and Silver Rate: २० दिवसांत सोन्याची घसरण चांदी तब्बल १२,२५६ ने स्वस्त… काय आहे आजचा सोने-चांदीचा भाव?

अर्थमंत्री रुपयावर बोलेनात, राजनाथ देशाऐवजी धर्मेंद्रच्या संरक्षणाला, तर खड्डामंत्री...; ठाकरेंचा मोदींच्या मंत्र्यांना टोमणा

Ujani Dam: उजनी धरणाकडे ७४ हजार क्युसेक पाण्याची आवक; साठा ७४ टक्क्यांवर, शेतकऱ्यांना दिलासा

Latest Marathi News Update : दीपके कुटुंबाशी नातेसंबंध; शिंदेंच्या मंत्र्याने घेतली अभिजीतच्या आई-वडिलांची भेट

SCROLL FOR NEXT