महाराष्ट्र बातम्या

पुरंदावडेत माउलींचे गोल रिंगण उत्साहात 

सुनील राऊत

नातेपुते - माउली... माउली...च्या नामघोषांत श्री संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज पुरंदावडे, ता. माळशिरस येथे अपार उत्साहात पार पडले. 

नातेपुते येथे पहाटे 5 ला पालखी सोहळाप्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर सकाळी 6.30 वा. सोहळ्याने माळशिरसकडे प्रस्थान ठेवले. सकाळचा विसावा मांडवे ओढ्यावर झाला. याठिकाणी माउलींना नैवेद्य व जेवणे झाली. आज सकाळी माउली निघाल्यापासून ढगाळ वातावरण होते. भिरभिरत्या वाऱ्यात लाखो वारकऱ्यांसह विश्व माउलींचा वैभवी सोहळा पुरंदावडे येथील भव्य मैदानात दुपारी 1.30 वा. दाखल झाला. या वेळी राजाभाऊ व रामभाऊ चोपदारांनी ओळीने दिंड्या आत सोडल्या. रिंगण मैदानाला प्रदक्षिणा करून दिंड्यादिंड्यांमधून पाऊले खेळत नामघोष सुरू होता. दरम्यान, पताकाधारी वारकऱ्यांना माउलींच्या पालखीच्या सभोवती उभे करण्यात आले. चोपदारांनी अश्वस्वार तुकाराम कोळी यांस अश्व सोडण्याची सूचना दिली. यानंतर माउलींचा अश्व सोडण्यात आला. माउलींच्या अश्वाने दौडण्यास सुरवात करताच लाखो उपस्थितांनी टाळ्या वाजवत माउली... माउली...चा गजर सुरू केला व दोनच मिनिटांत रिंगण पूर्ण झाले. रिंगण पूर्ण होताच उपस्थितांनी अश्वाच्या टाचेखालची माती कपाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT