fraud sakal
महाराष्ट्र बातम्या

गोडबोले म्हणाले..! ‘मी नायब तहसीलदार’, शासकीय जमिनी स्वस्तात मिळवून देतो, एकाला ४ कोटीला फसविले

नायब तहसीलदार असल्याचे सांगून सोलापूर व पुण्यातील जमिनी विकासाच्या प्रयोजनातून स्वस्तात मिळवून देतो म्हणून चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी श्रीशैलकुमार बसवण्णप्पा हादीमनी (रा. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : मंगळवेढ्याला नायब तहसीलदार असल्याचे सांगून सोलापूर व पुण्यातील जमिनी विकासाच्या प्रयोजनातून स्वस्तात मिळवून देतो म्हणून तब्बल चार कोटी १०० रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी श्रीशैलकुमार बसवण्णप्पा हादीमनी (रा. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये श्रीशैलकुमार हे त्यांचा भाऊ रेवणसिद्ध हिप्परगी यांच्यासोबत कामत हॉटेल येथे नाष्टा करायला गेले होते. त्यावेळी बाजूच्या टेबलावरील एकाने रेवणसिद्ध यांना नमस्कार केला. रेवणसिद्ध यांनी त्या व्यक्तीला जुन्या व्यवहाराचे पैसे परत करण्यास सांगितले. त्यावेळी श्रीशैलकुमार व मनोज गोडबोले यांची ओळख झाली.

आपण मंगळवेढ्याला नायब तहसीलदार असल्याचे त्याने श्रीशैलकुमार यांना सांगितले. शासकीय चलन भरून शासनाच्या जमिनी अथवा खासगी जमिनी कमी किंमतीत कायदेशीर मिळवून देतो, असे आमिष गोडबोले याने त्यांना दिले. त्यानंतर सोलापूर व पुण्यातील जमिनी विकासाच्या प्रयोजनातून मिळाल्याचे शासन मंजुरीचे बनावट आदेश व्हॉट्‌सॲपवर पाठवले. त्यानंतर वेळोवेळी चार कोटी रुपये घेतले. पण, प्रत्यक्षात ते आदेश बनावट असल्याची खात्री होताच त्यांनी सहा जणांविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत तक्रारी अर्ज दिला. हा प्रकार १० ऑगस्ट २०१८ ते ८ डिसेंबर २०२२ या काळात झाला आहे.

पोलिसांनी त्याची खात्री करून गुन्हा दाखल केला. मनोज अश्रुबा गोडबोले, राधा मनोज गोडबोले, यश मनोज गोडबोले (सर्वजण रा. नालंदा नगर, आरटीओ ऑफिसजवळ, सोलापूर), आदिती पांडुरंग गोसावी, सानिका अभय उपाध्याय (दोघी रा. मंत्री चंडक पार्क, विजयपूर रोड) व बिभीषण गुलाब लोंढे (रा. हुडको नं. तीन, कुमठा नाका) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

शासकीय व खासगी जमिनी शासकीय दरात विकासाच्या प्रयोजनातून मिळवून देतो, म्हणून चार कोटींची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचा तपास सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिस संशयितांच्या शोधात असून तपासाच्या अनुषंगाने, संशयितांना अटक केली जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT