Gofan Article  esakal
महाराष्ट्र बातम्या

गोफण| ऐका हो ऐकाSS.. कोण जास्त लोकप्रिय?

संतोष कानडे

पहिली दवंडी- ऐका हो ऐकाSS... सगळ्यांनी कान देऊन ऐकाSSS.. कानाचे आजार असणाऱ्यांनी ऐका अन् नसणाऱ्यांनीही ऐका! या राज्यात सर्वसामान्यांचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे सगळे सुखी, समाधानी आणि आनंदी आहेत. -आणि म्हणोन सर्वसामान्यांच्या सरकारचे अधिपती सर्वात लोकप्रिय ठरलेले आहेत...

सर्वसामान्यांच्या सरकारचे अधिपती-माननीय-वंदनीय-पूजनीय-प्रातःस्मरणीय-श्रीश्री-अनंतवेळा श्री.. आदरणीय नाथबापू एकशिंगे यांच्यावतीने कळवण्यात येतंय की, तेच महाराष्ट्रदेशी सर्वात प्रजाप्रिय-लोकप्रिय राजे आहेत. एका गोपनीय अभ्यासगटाने स्वयंप्रेरणेने तसे संशोधन सरकारदरबारी सादर केलेले आहे.

आणि म्हणोन- जसे पानिपताचे युद्ध झाले, हल्दीघाटीचे युद्ध झाले, प्लासीचे युद्ध झाले; तसेच एक युद्ध बरोब्बर वर्षभरापूर्वी झाले... सबंध ३३ देशांनी या युद्धाची नोंद घेतली. अन् ते युद्ध म्हणजे गुवाहाटीच्या झाडी-डोंगरातले युद्ध!! त्या युद्धखुना अंगाखांद्यावर बाळगून आपले नाथबापू एकशिंगे सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झगडत आहेत.. तेच लोकप्रिय राजे ठरले आहेत.

आणि म्हणोन- सबंध भारतवर्षात नमोशेठ अन् महाराष्ट्रदेशी आपले नाथबापू सर्वश्रेष्ठ आहेत. नीट ऐकाSS कान दुखत असला तरी हेच सत्य तुम्हाला ऐकावं लागेल. सर्वसामान्यांचे नाथ सर्वश्रेष्ठ आहेत-त्यांनाच पुढचे राजे म्हणून प्रजेने म्हणजे साक्षात तुम्ही लोकांनी पसंती दिलेली आहे. हे चांगलं ध्यानात असू द्या होSS!

हे नीट ऐकाSS.. शेकडा सव्वीस पूर्णांक एक लोकांना नाथबापू एकशिंगे पुढचे राजे म्हणून हवे आहेत. तर केवळ शेकडा तेवीस पूर्णांक दोन लोकांना उपराजे देवेंन्भाऊ परतफिरे (दुय्यम दर्जा) हवे आहेत. आहे की नाही गंमत?

दवंडी संपली.

दुसरी दवंडी- ऐका हो ऐकाSS.. कान देऊन ऐका..नीट ऐकाSS! ये फेविकॉल का जोड हैं तुटेगा नहीं सालाS.SS.. कुणी कितीही बोंबा ठोकल्या तरी 'या' दोघांना कुणी म्हणजे कुणीच वेगळं करु शकत नाही..

अनादी काळापासून ही मैत्री अबाधित आहे.. सबंध महाराष्ट्राला-देशाला या दोस्तीची जाण आहे.. किंबहुना ३३ देशांनी या मैत्रीचे गोडवे एकासुरात गायलेले आहेत.

आणि म्हणोन- सरकारला ह्या दुसऱ्या दवंडीद्वारे सांगावयाचे आहे की, शेकडा एकोन्पन्नास पूर्णांक तीन इतक्या जनतेला नाथबापू-देवेन्भाऊंची जोडी पसंत आहे, हे वास्तव नाकारुन चालणार नाही.

या जोडीला मिळालेलं हे प्रेम पाहून सर्वसमान्यांच्या सरकारचे अधिपती नाथबापू एकशिंगे आनंदान न्हाऊन निघालेले आहेत.

ऐकाSS..सर्वासमान्यांच्या सरकारच्या वतीने हे कळवण्यात येतंय की, या जोडगोळीवर असंच प्रेम असू द्या. कुणी जास्त-कमी लोकप्रिय असला तरी प्रेम मात्र सारखंच द्या. 'एकसमान हक्क-एकसमान प्रेम' हा नारा घेऊन आता सर्वसमान्यांचं सरकार जोमाने कामाला लागलं आहे.

आणि म्हणोन... जय महाराष्ट्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT