solapur rural police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! सोलापूर ग्रामीण पोलिसांतर्फे रोजगार मेळावा; ‘या’ ठिकाणी करा नावनोंदणी, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णींचा पुढाकार

सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पदवीधर तरुण-तरुणींसाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. सध्या त्यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पदवीधर तरुण-तरुणींसाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. सध्या त्यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नामांकित कंपन्यांमध्ये भरती होण्याची संधी या मेळाव्यातून मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ होऊन त्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळणार आहे. या मेळाव्यात दहावी-बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच अनुभवी व फ्रेशर तरुण-तरुणींना रोजगार तथा नोकरी मिळेल, असा विश्वास ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने गुन्हेगारीकडे वळलेल्या तरुणांसाठी हा रोजगार मेळावा मोठी संधी ठरणार आहे. मेळाव्यात खासगी कंपन्या, बँका, निमशासकीय संस्था तसेच खासगी क्षेत्रात नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अद्याप नावनोंदणी सुरू असल्याने मेळाव्याची तारीख व वेळ काही दिवसांनी कळविण्यात येणार आहे.

नावनोंदणी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी...

अधिक माहितीसाठी पोलिस हवालदार महेश कांबळे (९६२३४८३४८४), सुनील मेटे (९८५०८१०५४१), विकास पवार (९५५२५६१८४४) व प्रशांत म्हमाणे (९६६५२८४०९१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. तसेच ज्या तरुण-तरुणींना रोजगार तथा नोकरीची आवश्यकता आहे, त्यांनी मोबाईलवरील बारकोड स्कॅन करावा. त्यानंतर एक लिंक उघडेल. त्यामध्ये उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती भरून अर्ज सबमिट करायचा आहे.

तरुणांनी आवर्जुन घ्यावा सहभाग

पोलिस पाल्य, जिल्ह्यातील पारधी समाजासह सर्वच तरुण-तरुणींना या रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. ज्यांच्या हाताला काम (रोजगार) नाही, त्यांच्यासाठी आम्ही हा रोजगार मेळावा घेत आहोत. जूनअखेर मेळावा होईल. त्यासाठी अधिकाधिक तरुण-तरुणींनी नावनोंदणी करावी.

- अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT