तात्या लांडगे
सोलापूर : बिगर व्यावसायिक चारचाकी वाहनांसाठी (कार) १५ ऑगस्टपासून टोल नाक्यांवरील प्रवासात सूट मिळणार आहे. तीन हजार रुपयांत वर्षभर ही सवलत लागू असणार आहे. तीन हजारांचा रिचार्ज केलेल्या चारचाकी वाहनांना २०० हेलपाट्यांसाठी सवलत असेल, अशी माहिती सोलापूर-पुणे महामार्गाचे सोलापूरचे प्रकल्प संचालक राकेश जवादे यांनी दिली. सोलापूर शहर- जिल्ह्यात असलेल्या सुमारे दोन लाख कार चालकांना या सवलतीचा लाभ होईल.
सध्या टोल नाक्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल मोजावा लागतो. आता केंद्र सरकारने बिगर व्यावसायिक वाहनांसाठी पुन्हा सवलत लागू केली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन महिन्यांपूर्वी त्या सवलतीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आता स्वातंत्र्य दिनापासून होणार आहे. कोणत्याही व्यावसायिक (कमर्शिअल) वाहनांसाठी ही सवलत मिळणार नाही. तीन हजार रुपये एकदाच भरल्यानंतर सवलत मिळणारे बिगर व्यावसायिक वाहन देशभरातील कोणत्याही टोल नाक्यावरून २०० हेलपाटे मारू शकणार आहे.
आता कारसाठी किती टोल?
फास्टॅग नसलेल्या चारचाकी कार चालकास प्रवासाला जाताना १५० रुपये मोजावे लागतात आणि फास्टॅग असल्यास ७५ रुपये द्यावे लागतात. २४ तासात तो कारचालक पुन्हा त्याच रस्त्याने आल्यास येताना अवघा ३५ रुपये टोल आकारला जातो. २४ तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यास पुन्हा ७५ हजार रुपये मोजावे लागतात. आता सवलतीमुळे पुन्हा सवलत मिळणार आहे.
किमान ८००० रुपयांची बचत
सध्या फास्टॅग असलेल्या वाहनांना ज्या टोलवर जाताना ७५ रुपये द्यावे लागतात, ते वाहन २४ तासांत परत आल्यास त्याला येताना ३५ रुपये द्यावे लागतात. असे २०० हेलपाट्यांसाठी प्रत्येक कारचालकास ११ हजार रुपये मोजावे लागतात. पण, आता नव्या सवलतीमुळे २४ तासांची मर्यादा नसणार आहे. विशेष बाब म्हणजे आता कार चालकांना दोनशे हेलपाटे अवघ्या तीन हजार रुपयांत करता येणार आहेत.
‘या’ ॲपवरून घेता येईल सवलत
‘तीन हजार रुपयांत २०० हेलपाटे सवलतीत’ या सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कार चालकास ॲन्ड्राईड मोबाईलमधील प्ले स्टोअरमधून Rajmarg Yatra - Nhai हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यावर लॉगिन करून वाहनाचा क्रमांक टाकून पैसे भरल्यास सवलत मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.