IPL screen solapur

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! सोलापुरात पाहता येणार ‘आयपीएल’चे ‘हे’ २ सामने; ‘बीसीसीआय’चा निर्णय, नेहरू नगर मैदानावर १८ बाय ३६ फूटांचा स्क्रीन, वाचा...

सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने ‘आयपीएल’ सुरू आहे. दोन महिन्यांत १० संघांचे ७४ सामने होणार आहेत. त्यातील १ व २ मे रोजी होणारे सामने सोलापूरकरांना मोठ्या स्क्रीनवर मोफत पाहण्याची संधी ‘बीसीसीआय’ने उपलब्ध करून दिली आहे. नेहरू नगरच्या शासकीय मैदानावर त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने ‘आयपीएल’ सुरू आहे. दोन महिन्यांत १० संघांचे ७४ सामने होणार आहेत. त्यातील १ व २ मे रोजी होणारे सामने सोलापूरकरांना मोठ्या स्क्रीनवर मोफत पाहण्याची संधी ‘बीसीसीआय’ने उपलब्ध करून दिली आहे. नेहरू नगरच्या शासकीय मैदानावर त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

१ मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि २ मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या संघांत सामने होणार आहेत. दोन्ही सामन्यांची वेळ सायंकाळी साडेसातची आहे. हे दोन्ही सामने सोलापूरकरांना विनाशुल्क पाहता येणार आहेत. त्यासाठी नेहरू नगरच्या शासकीय मैदानावर १८ फूट उंच आणि ३६ फूट लांबीचा स्क्रीन लावला जाणार आहे. क्रिकेटप्रेमींना बसण्यासाठी स्क्रीनसमोर मॅट (चटई) टाकली जाणार आहे.

मागील आठ वर्षांपासून सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेटप्रेमींना ‘आयपीएल’ पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचे नेटके नियोजन केले जाते. गतवर्षी नेहरू नगरच्याच मैदानावर दोन दिवसांत १४ हजार क्रिकेटप्रेमींनी मोठ्या स्क्रीनवरून ‘आयपीएल’चे सामने पाहिले होते. यंदाही अशीच संधी मिळणार आहे. मैदानावरच वाहनांच्या पार्किंगची सोय असणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून क्रिकेटप्रेमींना तेथे प्रवेश दिला जाणार आहे.

मैदानावर सामना पाहत असल्याचा आनंद

‘आयपीएल’चे सामने मोठ्या स्क्रीनवर पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी तेथे लहान मुलांसाठी मनोरंजनाची साधने, ‘व्हीआयपीं’साठी वातानुकुलित खोल्या, तसेच बाजूला फूड स्टॉल असतील. तेथे सेल्फी पॉईंट तयार केलेला असेल. स्वच्छतागृहांचीही सोय करण्यात येणार आहे. चारही बाजूंना तात्पुरते कंपाउंड घातलेले असेल. ‘आयपीएल’ सामन्यावेळी स्क्रीन व तेथील जल्लोष देशभर दाखविला जातो. तेथे सर्वांना विनामूल्य प्रवेश दिला जाईल, अशी माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस चंद्रकांत रेंबुर्से यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT