Ladki Bahin Yojana

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी मिळणार ४५०० रुपये; नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार, वाचा...

सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरु असून डिसेंबरअखेर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे. आता मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच ४५०० रुपये मिळणार आहेत. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरु असून डिसेंबरअखेर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे. आता मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच ४५०० रुपये मिळणार आहेत. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे. तसेच मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते (३००० रुपये) देण्याचेही नियोजन सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या मुदतीत अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिला होत्या. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सर्व अर्जांची पडताळणी अशक्य होती. त्यामुळे कागदपत्रांच्या आधारावर पात्र लाडक्या बहिणींना सुरवातीला लाभ देण्यात आला. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यासाठी दरमहा १६६ कोटी ३५ लाखांचा निधी लागत होता. निकषांनुसार झालेल्या पडताळणीत सोलापूर शहर-जिल्ह्यातील दोन लाख लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा लाभ ३० कोटींनी कमी झाला आहे.

एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी, २१ पेक्षा कमी आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला, सरकारी नोकरदार लाभार्थी, पुरुष लाभार्थी, चारचाकी वाहने असलेल्या महिला, केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थी या सर्वांचा लाभ बंद करण्यात आला. त्यात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी होत्या. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा १५०० ऐवजी ५०० रुपये दिले जात आहेत. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून पुढे प्रत्येक महिन्याच्या १० ते १५ तारखेपूर्वी (वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत) लाभ दिला जाणार आहे.

ई-केवायसीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र आता सुरू असणाऱ्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळू शकते.

मुदतीत ई-केवायसी करावीच लागेल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींसाठी निधी उपलब्ध झाला आहे. नोव्हेंबर महिन्याचा लाभ त्यांना तीन-चार दिवसांत वितरित होईल. परंतु, लाडक्या बहिणींनी ३१ डिसेंबरपर्यंतच्या मुदतीत ‘ई-केवायसी’ करून घ्यावी. फेब्रुवारीपासून ई-केवायसी केलेल्या पात्र लाभार्थींचाच लाभ पुढे नियमित सुरू राहील.

- किरण जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

लाडकी बहीण योजनेची सोलापूरची स्थिती

  • सुरवातीचे लाभार्थी

  • ११.०९ लाख

  • दरमहा लागणारा निधी

  • १६६.३५ कोटी

  • पडताळणीत अपात्र ठरलेले

  • २ लाख

  • आता दरमहा लागणारा निधी

  • १३६.३५ कोटी

  • कमी झालेला लाभ

  • ३० कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

Pune Municipal Elections : पुण्यात महापालिका निवडणुकीपूर्वी धक्कादायक वळण! भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना जोरदार झटका

Mumbai Municipal Corporation Election : मोट बांधण्याची मविआची हालचाल; मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी प्रयत्न

Kolhapur Election : कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीवर शिक्कामोर्तब; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, निवडणूकची रणधुमाळी सुरू

SCROLL FOR NEXT