वीज बिल  टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

वीज ग्राहकांसाठी खुषखबर! ‘ही’ कागदपत्रे घेऊन अर्ज करा, मिळेल २४ तासात वीज कनेक्शन

घरगुती व व्यावसायिक (वाणिज्य) वीज कनेक्शनसाठी कागदपत्रांसह अचूक अर्ज करणाऱ्या ग्राहकांना आता अवघ्या २४ तासांत कनेक्शन दिले जाणार आहे. ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता रमेश राठोड यांनी अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : घरगुती व व्यावसायिक (वाणिज्य) वीज कनेक्शनसाठी कागदपत्रांसह अचूक अर्ज करणाऱ्या ग्राहकांना आता अवघ्या २४ तासांत कनेक्शन दिले जाणार आहे. ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता रमेश राठोड यांनी अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना वीज कनेक्शनसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ शाचेअंतर्गत घोडातांडा, कुलकर्णी तांडा, बोरामणी शाखा, अंत्रोळी शाखेअंतर्गत अर्ज केलेल्या ग्राहकांना उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता आलम शेख, गणेश कांबळे, राजशेखर गुरव यांनी २४ तासांत नवीन वीज कनेक्शन दिले. अशोक हनमंत कोळी, छाया शिवानंद राठोड, तुकाराम पवार, संगमेश्वर शरणार्थी, शिवाजी बेळे यांनी पहिल्यांदाच वीज कनेक्शनसाठी अर्ज केला होता. काही दिवस आता वीज कनेक्शन मिळणार नाही, असा त्यांचा समज होता. पण, त्या ग्राहकांना ‘महावितरण’ने एका दिवसातच कनेक्शन दिले.

विशेष म्हणजे त्यातील दोघांना स्वत:हून ऑनलाईन अर्ज करता येत नव्हता. त्यांचे अर्ज अधिकाऱ्यांनी स्वत: कार्यालयात बसून भरला आणि कनेक्शन दिले. वीजेची लाईन त्यांच्या घराजवळून गेल्याने त्यांना तत्काळ कनेक्शन दिले. ग्रामीणमचे कार्यकारी अभियंता रमेश राठोड यांनी त्या अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतूक केले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनाही नवीन कनेक्शन तत्काळ मिळते, पण त्यांनी अर्ज केल्यानंतर सेवा शुल्क भरावे. तसेच कनेक्शनपासून जवळ वीजेची लाईन केली असल्यास त्यांनाही काही दिवसात कनेक्शन दिले जात आहे. सध्या ‘महावितरण’चे ग्रामीणमध्ये घरगुती व व्यावसायिक ग्राहाकांची संख्या एक लाख ४५ हजार तर शेतीपंपाचे ग्राहक एक लाख दोन हजारापर्यंत आहेत.

नवीन कनेक्शनसाठी लागणारी कागदपत्रे

  • - घर जागेचा उतारा किंवा टॅक्स भरलेली पावती

  • - आधार कार्ड किंवा पॅनकार्ड

  • - ‘महावितरण’चा ए-वन अर्ज भरून द्यावा लागतो

ग्राहकांना येथे करता येईल अर्ज

  • - महावितरणच्या ‘mahadiscom’वर ऑनलाईन अर्ज करता येईल

  • - ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांना ‘महावितरण’च्या शाखा कार्यालयात सोय

  • - ग्राहक सुविधा केंद्रात देखील नवीन कनेक्शनसाठी अर्ज करण्याची सोय

अचूक अर्ज करा, लगेच मिळेल कनेक्शन

ज्या नवीन ग्राहकांना घरगुती किंवा वाणिज्य कनेक्शन घ्यायचे आहे, त्यांनी कागदपत्रांसह ‘महावितरण’कडे करावा. शाखा अभियंता कार्यालयाकडून त्यांची पाहणी होईल आणि २४ तासांत त्या ग्राहकाला वीज कनेक्शन मिळेल. तसे निर्देष सर्व शाखा अभियंत्यांना दिले आहेत.

- रमेश राठोड, कार्यकारी अभियंता (ग्रामीण), महावितरण, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT