Punyashlok Ajilyadevi Holkar solapur univercity Esakal
महाराष्ट्र बातम्या

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता विद्यापीठातही ‘अभियांत्रिकी’चे शिक्षण; ‘या’ ८ अभ्यासक्रमांना मंजुरी, २८० प्रवेश क्षमता, वाचा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आता अभियांत्रिकी शिक्षणास मंजुरी मिळाली आहे. सुरुवातीला आठ अभ्यासक्रम सुरू होणार असून त्यांची प्रवेश क्षमता २८० असणार आहे. स्थानिक उद्योगांची गरज ओळखून सुरुवातीला बायोटेक्नॉलॉजी, केमिकल टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲंड मशीन लर्निंग, सायबर सेक्युरिटी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, डाटा सायन्स, नॅनो सायन्स ॲंड टेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजी असे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आता अभियांत्रिकी शिक्षणास मंजुरी मिळाली आहे. सुरुवातीला आठ अभ्यासक्रम सुरू होणार असून त्यांची प्रवेश क्षमता २८० असणार आहे. स्थानिक उद्योगांची गरज ओळखून सुरुवातीला बायोटेक्नॉलॉजी, केमिकल टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲंड मशीन लर्निंग, सायबर सेक्युरिटी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, डाटा सायन्स, नॅनो सायन्स ॲंड टेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजी असे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात अभियांत्रिकीची १५ महाविद्यालये आहेत. आता राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोलापूरसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास मंजुरी दिली आहे. त्यातच आता विद्यापीठातही अभियांत्रिकीचे शिक्षण प्रथमच सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी परजिल्ह्यात जावे लागणार नाही, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. काही वर्षांत सोलापुरात आयटी पार्कदेखील सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातच नोकरीदेखील उपलब्ध होणार आहे. ‘एआयसीटीई’ व राज्य शासनाच्या मंजुरीनंतर विद्यापीठ आता पुढील आठवड्यात अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी पदभरतीस सुरुवात करणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळतील शासनाच्या सवलती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात या वर्षीपासून अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मान्यता मिळाली आहे. आता एक कोड मिळाला की, प्रवेश प्रक्रियेत विद्यापीठाचाही सहभाग होईल. शुक्रवारी (ता. २६) आम्ही त्यासंदर्भात बैठक घेतली. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच अभियांत्रिकी शिक्षणाचा विभाग सुरू होईल. पदभरतीची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होईल.

- डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

‘हे’ असणार अभ्यासक्रम

  • अभ्यासक्रम प्रवेश क्षमता

  • बायोटेक्नॉलॉजी २०

  • केमिकल टेक्नॉलॉजी २०

  • ‘एआय’ ॲंड मशीन लर्निंग ६०

  • नॅनो सायन्स ॲंड टेक्नॉलॉजी २०

  • सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी २०

  • सायबर सेक्युरिटी ६०

  • फूड टेक्नॉलॉजी २०

  • डाटा सायन्स ६०

  • एकूण २८०

प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय सवलती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आता स्वयंअर्थसहाय्यित तथा कायम विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू होणार आहे. आता ‘एआयसीटीई’ आणि राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडूनही मान्यता मिळाल्याने कंत्राटी तत्त्वावर सर्व पदभरती होईल. सायन्स कॅम्पसमध्येच अभियांत्रिकीचे वर्ग भरतील. या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या मुलींना संपूर्ण शिक्षण मोफत असून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळेल. याशिवाय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांनादेखील शासकीय सवलती लागू असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT