Mantralay esakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुषखबर; राज्य सरकार पुढच्या महिन्यात देणार २००० रुपये; त्यासाठी ‘हे’ करावे लागेल

राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेअंतर्गत राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये तीन हप्त्यात देणार आहे. आता मेअखेरीस केंद्राच्या हप्त्यासोबतच त्या लाभार्थी शेतकऱ्यांना राज्याच्या योजनेचा पहिला हप्ता वितरीत होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेअंतर्गत राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये तीन हप्त्यात (दर चार महिन्याला) देणार आहे. कृषी विभागाने योजना राबविण्यासंदर्भातील कार्यवाही संदर्भातील सूचनांचा आराखडा राज्य सरकारला सादर केला आहे. आता मेअखेरीस केंद्राच्या हप्त्यासोबतच त्या लाभार्थी शेतकऱ्यांना राज्याच्या योजनेचा पहिला हप्ता वितरीत होणार आहे.

केंद्राच्या ‘पीएम’ किसान सन्मान निधीतून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये (चार महिन्यांच्या अंतराने) तीन हप्त्यात दिले जातात. आता त्याच शेतकऱ्यांना राज्य सरकार दरवर्षी सहा हजार रुपये देणार आहे. केंद्राच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष असणार आहेत. आयकरदाते, सरकारी नोकदार, लोकप्रतिनिधी या योजनेसाठी अपात्र आहेत. राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांकडे १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीची जमीन आहे. पण, योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, आधार लिंक बॅंक खाते आणि संबंधित लाभार्थींच्या नावावरील सर्व मालमत्तांची माहिती देणे बंधनकारक आहे.

जवळपास १२ लाख शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांना केंद्राच्या योजनेचे काही हप्ते मिळालेले नाहीत. त्यामुळे आता त्या शेतकऱ्यांना तिन्ही टप्पे पूर्ण करावेच लागणार आहेत, अन्यथा राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान’चाही लाभ मिळणार नाही. राज्य सरकारने कृषी विभागाशी पत्रव्यवहार करून मार्गदर्शक सूचनांचा प्रस्ताव मागवून घेतला आहे.

दुसरीकडे आता केंद्राकडूनही राज्यातील लाभार्थींची माहिती मागविली आहे. केंद्र सरकारचा चौदावा हप्ता आता मेअखेरीस शेतकऱ्यांना मिळणार असून राज्य सरकार त्याचवेळी शेतकऱ्यांना पहिला हप्ता देणार आहे. आता मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होऊन वित्त विभागाच्या माध्यमातून त्यासाठी जवळपास वार्षिक पाच हजार ७०० कोटींची तरतुद करावी लागणार आहे.

केंद्राच्या निकषांप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष

‘पीएम’ किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेतूनही राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे. योजनेच्या कार्यवाहीचा आराखडा कृषी विभागाने शासनाला सादर केला आहे.

- सुनिल चव्हाण, आयुक्त, कृषी

‘शेतकरी सन्मान’च्या अटी

  • - १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमिनीधारक शेतकरीच पात्र

  • - सन्मान निधी मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल

  • - लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी

  • - बॅंक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक

‘नमो शेतकरी महासन्मान’चे लाभार्थी

  • सन्मान निधीसाठी पात्र

  • ९५.८४ लाख

  • ‘ई-केवायसी’धारक शेतकरी

  • ८२.९७ लाख

  • वार्षिक हप्ते

  • पहिला हप्ता

  • २०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spare Parts Price: आधी सोनं-चांदी उच्चांकी, आता वाहन खर्चही गगनाला भिडला; टायर्स आणि गाड्यांच्या सुटे भागांचे दर वाढले

Horoscope : आजपासून गुप्त नवरात्र सुरू! 'या' 4 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार; अचानक मिळतील पैसे, मिळेल मोठं सरप्राइज, इच्छापूर्ती योग

कलर्स मराठीकडून सुरज चव्हाणला 'BBM 6'चं आमंत्रण; रीलस्टार घरात जाणार? उत्तर देत म्हणाला- बोलावलंय तर...

U19 World Cup: १८ षटकार अन् २९ चौकार... दक्षिण आफ्रिकेच्या यंगिस्तानचा मोठा पराक्रम; स्पर्धेत गाठला नवा उच्चांक

Seized Vehicles: पोलीस ठाणे, पोलीस यार्ड आणि रस्त्यांवरील जप्त वाहनांचा ढिगारा हटवा; राज्य सरकारचा मोठा आदेश, डेडलाईन काय?

SCROLL FOR NEXT