शेतकऱ्यांसाठी खुशखबर

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीप पीकविमा; उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर; शेतकऱ्यांना २१०० कोटी मिळण्याची आशा

राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी ५२६ कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांचे सुमारे १४ कोटी रुपये होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी ५२६ कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांचे सुमारे १४ कोटी रुपये होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून जानेवारीअखेर पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळणार आहे.

राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते. याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात. राज्य सरकारने ‘एक रुपयात पीकविमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल ९४ लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल, या आशेने स्वत: विमा संरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरला. राज्यात सुमारे ५० हजार ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले. त्यातून अपेक्षित उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पन्नाची माहिती संकलित करण्यात आली. राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती केंद्र सरकारला पाठविली आहे.

केंद्राकडे या माहितीवर कार्यवाही सुरू असून २० जानेवारीनंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, महसूल मंडळातील शेतकरी पीकविमा मिळण्यास पात्र आहेत, कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार आहे, हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पीकविमा उतरविलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही अधिकारी म्हणाले. काही तालुक्यातील ठरावीक मंडळातील शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पीकविम्यासाठी पात्र ठरतील, असेही सांगण्यात आले.

खरीप पीकविम्याची स्थिती अशी...

  • अर्जदार शेतकरी

  • ९४ लाख

  • शेतकऱ्यांनी भरलेला हिस्सा

  • ५२६ कोटी

  • राज्य व केंद्राचा हिस्सा

  • १८६० कोटी

उंबरठा उत्पन्नावर मिळतो पिकविमा

उंबरठा उत्पन्नापेक्षा प्रत्यक्षात आलेले उत्पन्न जास्त असल्यास पीकविमा मिळत नाही. आपल्याकडील उंबरठा उत्पन्न पूर्वीपासूनच कमी असल्याने सर्वच विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. पुढील महिन्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पीकविमा मिळेल.

- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded News: काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण भाजपमध्ये जाणार?; दोन दिवसांपासून सोशल मीडियावरून चर्चा, राजकीय क्षेत्रात खळबळ!

Teddy Day 2026: या रंगाचा 'Teddy' देऊ नका, नाहीतर पार्टनर होईल नाराज! जाणून घ्या आज इंप्रेस करण्याचे खास टिप्स

Latest Marathi News Live Update : राज्यभरात आजपासून बारावीची परीक्षा सुरू

HSC English Exam: इंग्रजीच्या पेपरने बारावीला सुरुवात; पोलिसांचा खडा पहारा

Jamkhed Crime: फोनवर बोलत नसल्याच्या रागातून नृत्यांगणेवर हल्ला; जामखेडमधील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT