ST Bus esakal
महाराष्ट्र बातम्या

मुलींसाठी खुशखबर! शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता मुलींना एसटी बसचा मोफत प्रवासी पास

पाचवी ते १२वीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. प्रत्येक मुख्याध्यापकांनी त्यांचा शाळेमधील मुलींची यादी संबंधित आगारप्रमुखांकडे द्यावी. त्या मुलींना आता शाळेतच मोफत बस प्रवासाचा पास मिळणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते १२वीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. प्रत्येक मुख्याध्यापकांनी त्यांचा शाळेमधील मुलींची यादी संबंधित आगारप्रमुखांकडे द्यावी. ज्या शाळांमध्ये मुलींची संख्या ५० ते १०० पेक्षा अधिक असेल, त्याठिकाणी संबंधित आगाराचे अधिकारी जाऊन जागेवरच पास देतील.

यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात गुरुवारपासून (ता. १५) झाली आहे. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये-जा करण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोफत पास देण्याची सोय केली आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळतो. बारावीनंतरच्या मुलींना एक तृतीयांश रक्कम भरल्यावर शैक्षणिक सवलतीचा पास दिला जातो.

पूर्वीसारखे आता प्रत्येक मुलींना पास काढण्यासाठी आगारासमोरील रांगेत उभारण्याची किंवा हेलपाटे मारण्याची गरज नाही. आगारातील अधिकारी मोठ्या शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांच्या मागणी अर्जावरून शाळेतच पास देतील, अशी सोय करण्यात आली आहे. त्यासाठी केवळ त्या मुलीचे बोनाफाईड लागणार आहे. मुलींना तीन-तीन महिन्यांचे पास दिले जातात. एकदा पास काढला की पुन्हा तीन महिन्यानंतरच पास मिळतो. त्यावेळी देखील मुख्याध्यापकांनी पत्र देणे आवश्यक आहे.

कागदपत्रे काय लागतील अन्‌ तक्रार कोठे करायची...

ज्या शाळेत मुलगी शिकत आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून बोनाफाईड घेऊन एक अर्ज केल्यानंतर एसटी महामंडळाकडून (संबंधित आगारातून) १०० टक्के मोफत प्रवासाचा पास दिला जातो. हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही, अशी व्यवस्था असून कोणी अधिकारी टाळाटाळ करीत असल्यास थेट आपल्याशी संपर्क (मो. नं. ९०२१८९३७०४) साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक श्री. भालेराव यांनी केले आहे.

कशी मिळवायची सवलत...

शाळेचा मुख्याध्यापक त्यांच्या एखाद्या शिक्षकाच्या माध्यमातून सर्व मुलींची यादी आगार प्रमुखांना सादर करेल. त्यांची शैक्षणिक कागदपत्रे पाहून त्या सर्वच मुलींना एसटीच्या मोफत प्रवासाचे पास दिले जातील. मुलींना किंवा त्यांच्या पालकांना एसटीच्या आगारात जाण्याची आता आवश्यकता नाही. दरम्यान, मोफत किंवा सवलतीचे पास देण्यासाठी प्रत्येक आगारात स्वतंत्र व्यवस्था असून सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत त्याठिकाणी पास काढता येतील, अशी माहिती विभाग नियंत्रक श्री. भालेराव यांनी यावेळी सांगितले.

आता हेलपाटे मारावे लागणार नाहीत

इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत प्रवासाचे पास एसटी महामंडळाकडून मिळतात. त्यासाठी त्यांना आता विभाग किंवा आगारात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. मुख्याध्यापकांनी पाठविलेल्या यादीनुसार सर्व मुलींना पास दिले जातील. मोठ्या शाळांमध्ये आमचे अधिकारी जाऊन त्याठिकाणी पास देतील, अशी व्यवस्था केली आहे.

- विनोद भालेराव, विभाग नियंत्रक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT