Airport

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

सोलापूर विमानतळावरून गोवा, मुंबई व आता हैदराबाद शहर सोलापूरशी विमानसेवेने जोडले जाणार आहे. आज गुरुवारपासून तिकीट बुकिंगला सुरवात होणार आहे. १७ एप्रिलला सोलापूर विमानतळावरून हैदराबादसाठी पहिले उड्डाण होणार आहे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून गोवा, मुंबई व आता हैदराबाद शहर सोलापूरशी विमानसेवेने जोडले जाणार आहे. आज गुरुवारपासून तिकीट बुकिंगला सुरवात होणार आहे. १७ एप्रिलला सोलापूर विमानतळावरून हैदराबादसाठी पहिले उड्डाण होणार आहे. हैदराबादसाठी अंदाजे तीन हजार रुपये तिकीट राहणार असून वेळेबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केली नाही, पण सायंकाळी विमानसेवा राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूरहून फ्लाय ९१ कंपनीकडून सुरवातीस गोवा, त्यानंतर स्टार एअर इंडिया कंपनीकडून सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू केली. सोलापूर ते बंगळुरू, सोलापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे. पण, नाईट लॅंडिंगची व्यवस्था नसल्याने दोन्ही शहरासाठी विमानसेवा सुरू करण्यास कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर फ्लाय ९१ कंपनीकडून सोलापूर-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. २ एप्रिल रोजी तिकीट बुकिंगला सुरवात आणि १७ एप्रिलला हैदराबादसाठी पहिले विमान झेपावणार आहे.

गोवा-सोलापूर १७ एप्रिलपासून सहा दिवस

गोवा-सोलापूर विमानसेवा आठवड्यातून चार दिवस होती, आता ती सहा दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विमानसेवा १७ एप्रिलपासून सुरू होणार असून, वाढ केलेल्या दोन दिवसांसाठीची तिकीट बुकिंग आज २ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.

तिरुपती विमानसेवेची प्रतिक्षाच

सोलापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार कंपनीकडे सर्व्हेही करण्यात आला. पण कंपनीने पुणे ते तिरूपती व्हाया सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विमानतळावर स्लॉट नसल्याने तिरुपतीची विमानसेवा लांबणीवर पडली आहे. सोलापूर विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा नसल्याने मुहूर्त लांबणीवर पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT