E-Bus (File Photo) Sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरकरांसाठी गूड न्यूज! दिवाळीनंतर शहरातून धावणार ई-बस; ५ ते २० रुपयांत कोठेही करता येणार प्रवास; ऑनलाइन, ऑफलाइन अन्‌ एटीएमद्वारेही काढता येईल तिकीट

केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-बस’ योजनेतून सोलापूर महापालिकेला १०० ई-बस मिळणार आहेत. त्यातील नऊ मीटरच्या ३० बस नोव्हेंबर महिन्यात सोलापुरात दाखल होणार आहेत. त्यासंबंधीचा पत्रव्यवहार महापालिकेने केंद्र सरकारला केला आहे. दिवाळीनंतर प्रवाशांना अवघ्या ५ ते २० रुपयांत शहरातील कोणत्याही मार्गांवर प्रवास करता येणार आहे. या बसची आसनक्षमता ३५ प्रवाशांची आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-बस’ योजनेतून सोलापूर महापालिकेला १०० ई-बस मिळणार आहेत. त्यातील नऊ मीटरच्या ३० बस नोव्हेंबर महिन्यात सोलापुरात दाखल होणार आहेत. त्यासंबंधीचा पत्रव्यवहार महापालिकेने केंद्र सरकारला केला आहे. दिवाळीनंतर प्रवाशांना अवघ्या ५ ते २० रुपयांत शहरातील कोणत्याही मार्गांवर प्रवास करता येणार आहे. या बसची आसनक्षमता ३५ प्रवाशांची आहे.

सोलापूरमध्ये तत्कालिन नगरपालिकेचा परिवहन उपक्रम १९४९ पासून सुरू झाला. सुरवातीला खान नामक व्यक्ती खासगी तत्त्वावर सेवा देत होते. त्यानंतर हा उपक्रम सोलापूर नगरपालिकेकडे हस्तांतरीत झाला. १९६५ साली सोलापूर महापालिका झाल्यावर तो उपक्रम महापालिकेतर्फे सुरू झाला. महापालिकेकडील या परिवहन उपक्रमाला आता ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. १७३ बसगाड्यांमधून दररोज पाच लाखांहून अधिक प्रवाशांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्वस्तात सेवा देणारा हा उपक्रम सध्या बंद पडण्याच्या स्थितीत आहे.

सध्या या उपक्रमाकडे अवघ्या २२ ते २५ बस उरल्या आहेत. महापालिकेच्या हक्काच्या बस थांब्यावर ‘बस कमी आणि रिक्षाच जास्त’ अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व बस थांब्यांची सद्य:स्थिती काय? याचा सर्व्हे सुरू केला आहे. ई-बस शहरात येण्यापूर्वी सर्व बस थांब्यांची दुरूस्ती केली जाणार असून त्याठिकाणी एकही रिक्षा थांबणार नाही, अशी व्यवस्था उभारली जाणार आहे.

माहिती केंद्र शासनाला कळविली

केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-बस योजनेतून १०० गाड्या सोलापूर महापालिकेला मिळणार आहेत. त्यासाठी सम्राट चौक परिसरात १० एमव्हीए क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू झाले आहे. दिवाळीनंतर (ऑक्टोबर-नोव्हेंबर) सुरवातीला ३० बसगाड्या आपल्याला मिळतील. त्यासंबंधीची माहिती केंद्र शासनाला कळविली आहे.

- तैमूर मुलाणी, उपायुक्त, महापालिका सोलापूर

चार्जिंग स्टेशनसाठी अडीच किलोमीटर विद्युत लाईन

वसंत विहार येथील महावितरणच्या विद्युत स्टेशनपासून सम्राट चौकातील चार्जिंग स्टेशनपर्यंत (अडीच किमी) वीजेचे कनेक्शन नेले जाणार आहे. त्याचा सर्व्हे झाला असून धर्मवीर संभाजी महाराज चौकाजवळील ॲम्बेसेडर हॉटेलजवळून चार्जिंग स्टेशनपर्यंत विजेची लाईन (३३ केव्ही) नेली जाणार आहे. त्यासाठी ठेकेदार नेमला असून ऑक्टोबर २०२५ पर्यंत त्यांनी काम पूर्ण करायचे आहे. चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने महावितरणला जागा हस्तांतर केली आहे. तेथे एकाचवेळी २० बसगाड्या चार्जिंग करू शकणार आहेत.

ऑनलाइन, ऑफलाइन अन्‌ एटीएमद्वारेही काढता येईल तिकीट

केंद्र शासनाच्या ई-बस सोलापुरात आल्यानंतर प्रवाशांना प्रत्येक मार्गावर अचूक वेळेत बस उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांना फोन पे, गुगल पेसह अन्य ॲपद्वारे क्युआर कोडवरून ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे. याशिवाय रोखीने आणि एटीएम कॉर्डद्वारे देखील तिकीटे काढता येतील. शालेय विद्यार्थीनींना क्युआर कोड असलेला मासिक पास दिला जाणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्तांनी दिली.

मक्तेदारामार्फत चालतील ई-बस, पण...

केंद्राच्या योजनेतून ९ आणि १२ मीटर अशा दोन प्रकारच्या ई-बस मिळणार आहेत. ९ मीटरच्या बसमध्ये ३५ तर १२ मीटरच्या गाड्यांमध्ये ४५ प्रवाशी बसू शकतात. या गाड्या केंद्र सरकारने नेमलेला ठेकेदारामार्फत चालविल्या जाणार आहेत. प्रतिकिमी दर निश्चित झाला असून तेवढे पैसे मक्तेदाराला द्यायचे, उर्वरित उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल. तत्पूर्वी, मार्ग व थांबे निश्चित केले जाणार आहेत.

रिक्षाचे तिकीट १० ते ३० रुपये; बसमधील प्रवाशांना ५ ते २० रुपये तिकीट

सोलापूर शहरातील रिक्षांची संख्या सध्या ४० हजारांपर्यंत असून रिक्षातून प्रवास करताना प्रवाशांना किमान १० ते जास्तीत जास्त ६० रुपये द्यावे लागतात. दिवसा व रात्रीचे दर वेगवेगळे असून खासगी भाडे तर ३० ते १५० रुपयांपर्यंत आहे. या उलट परिवहनच्या बसमधून शहरात कोठेही प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ५ ते २० रुपयेच मोजावे लागतील. याशिवाय ‘सोलापूर दर्शन’ अशाही काही बसगाड्या असतील. त्यात ठरावीक रकमेचे तिकीट काढल्यावर दिवसभर त्या प्रवाशाला बसमधून शहरात कोठेही फिरता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police officer kicking protester VIDEO: …अन् पोलिस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलने 'त्या' आंदोलकाच्या कंबरेत घातली लाथ ; व्हिडिओ व्हायरल !

Local Megablock: प्रवाशांनी खबरदारी घ्या! मुंबई लोकलच्या मार्गावर रात्र आणि दिवसाचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? जाणून घ्या...

तेजश्रीसोबत नवऱ्याला रोमान्स करताना पाहून काय म्हणाली सुबोधची पत्नी? दिली भन्नाट प्रतिक्रिया, म्हणते- अगं तू...

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT