Maharashtra TET Result

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

शिक्षकांसाठी खुशखबर! राज्य शासन बदलणार ‘हा’ ‘जीआर’; शिक्षकांना ‘टीईटी’च्या मिळणार ६ संधी; सर्वोच्च न्यायालयाची मुदत ऑगस्ट २०२७ पर्यंत, वाचा...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आता २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील पहिली ‘टीईटी’ जूनअखेर- जुलै महिन्यात होईल. त्यानंतर याच वर्षातील नोव्हेंबरमध्ये दुसरी ‘टीईटी’ घेतली जाणार आहे. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षातील पहिली परीक्षा जूनमध्ये होईल; कारण ३१ ऑगस्टपूर्वी निकाल जाहीर करावा लागणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आता २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील पहिली ‘टीईटी’ जूनअखेर- जुलै महिन्यात होईल. त्यानंतर याच वर्षातील नोव्हेंबरमध्ये दुसरी ‘टीईटी’ घेतली जाणार आहे. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षातील पहिली परीक्षा जूनमध्ये होईल; कारण ३१ ऑगस्टपूर्वी निकाल जाहीर करावा लागणार आहे. दुसरीकडे, ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या तीन ‘सीटीईटी’ होणार आहेत. १ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी सक्तीचा निर्णय घेतला आणि त्यासाठी दोन वर्षांची मुदतही दिली. ही मुदत ३१ ऑगस्ट २०२७ रोजी संपणार आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर नियुक्त सर्वच शिक्षकांना, ज्यांचे वय ५३ वर्षांपर्यंत आहे त्यांना दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण व्हायचे आहे. मुदतीत पात्रता पूर्ण न करणाऱ्यांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामध्ये त्या वर्गांवरील तथा शाळांमधील मुख्याध्यापकांचा देखील समावेश आहे. दुसरीकडे, यापुढे शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ घेण्यासाठी देखील ‘टीईटी’ उत्तीर्ण असावे लागणार आहे.

२३ नोव्हेंबरला झालेल्या ‘टीईटी’त १२ टक्केसुद्धा उमेदवार उत्तीर्ण झाले नाहीत. उद्या (शनिवारी) केंद्राची सीटीईटी होणार असून, या परीक्षेचा निकाल देखील कमीच असतो. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना पुढच्या सहा मुदतीत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावीच लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अध्यापनाबरोबर शिक्षकांना स्वत:ला देखील अभ्यास करावा लागणार आहे.

शासनाला पाठविला प्रस्ताव

केंद्र शासनाच्या सीटीईटी वर्षातून दोनदा होतात. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे देखील वर्षातून दोन परीक्षा घेतल्या जातील. तसा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.

- डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

राज्य सरकारच्या मान्यतेकडे शिक्षकांचे लक्ष

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी एकदाच ‘टीईटी’ घेतली जात होती, तसा शासन निर्णय आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना दोन वर्षांत पात्रता पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ती मुदत ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत असणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शासन निर्णय बदलावा आणि परीक्षा परिषदेला देखील वर्षातून दोनदा परीक्षा घेण्यास परवानगी द्यावी लागणार आहे. तसा प्रस्ताव परीक्षा परिषदेने शासनाला पाठविला आहे. त्यावर आता राज्य सरकारकडून तत्काळ मान्यता मिळणार का, याकडे राज्यातील पावणेदोन लाख शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: मुंबईचा आयुष म्हात्रे आता विश्वविजेता कर्णधार! मोहम्मद कैफ, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

U19 World Cup: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली... आयुष म्हात्रेच्या चॅम्पियन टीमबद्दल अन् वैभव सूर्यवंशीबद्दल कोण काय म्हणालं? पाहा

U19 World Cup: आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाने जगज्जेतेपद जिंकताच कसं केलं सेलिब्रेशन; Video Viral

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT