महाराष्ट्र बातम्या

आनदाची बातमी; चार दिवसात उजनी धरण येणार "प्लस'मध्ये 

संतोष सिरसट

सोलापूर ः उजनी धरणाच्या परिसरात या नक्षत्रातही चांगला पाऊस पडत आहे. त्याचबरोबर दौंड येथून धरणात जवळपास साडेचार हजार क्‍युसेकने पाणी येत आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसात धरण "प्लस'मध्ये येण्याची शक्‍यता लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

उजनी धरणाकडे सोलापूरसह पुणे व नगर या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस असल्याने धरण लवकरच भरण्याची आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. मृग नक्षत्राबरोबरच आता सुरु असलेल्या पुनर्वसू नक्षत्रातही चांगला पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. 16 जूनला धरणात वजा 23 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामध्ये आता वाढ झाली आहे. धरण परिसरात पाऊस होत असल्याने पाणीपातळीच्या वाढीस मदत होत आहे. दौंड येथून धरणात येणारे पाणी कमी जास्त होत आहे. सकाळी चार हजार 693 क्‍सुसेकने पाणी येत होते. त्यामध्ये सायंकाळी सहा वाजता किंचीतशी घट झाली. धरणात येणाऱ्या पाण्याची स्थिती हीच राहिली तर पुढील तीन-चार दिवसांमध्ये धरण "प्लस'मध्ये येण्याची शक्‍यता असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT