ujni solapur pipline
ujni solapur pipline sakal
महाराष्ट्र

आनंदाची बातमी! मशिनरी आली, सोमवारी सुरु होणार समांतर जलवाहिनीचे काम; नोव्हेंबर २०२४नंतर नियमित पाणी

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा नियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता १८ महिन्यांत सुटणार आहे. सोलापूर ते उजनी संमातर जलवाहिनीचे काम नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करून देण्याची अट घालून कामाचा मक्ता आता ‘पोचमपाड’ कंपनीला दिला आहे. मक्तेदाराकडून बॅंक गॅरंटी घेऊन सोमवारी (ता. २९) मक्तेदाराला नवीन वर्क ऑर्डर दिली जाणार आहे.

सोलापूर शहराला मागील ३० वर्षांपासून नियमित पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे. ‘सकाळ’ने त्यावर सातत्याने आवाज उठविला असून आता महापालिकेने १५ जूनपासून तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे. दुसरीकडे सोमवारपासून आता समांतर जलवाहिनीच्या कामाला सुरवात देखील होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून लक्ष्मी व पोचमपाड या दोन मक्तेदारांमधील लवादाकडील तिढा सोडविला आहे. पाकणी ते सोरेगावपर्यंत ११० ‘एमएलडी’ची पाइपलाइन असणार असून त्याचे काम पूर्ण देखील झाले आहे. ६० ‘एमएलडी’ पाणी पाकणी पंपहाऊसवरून उचलून थेट शहराला दिले जाणार आहे. पाकणी ते उजनी या अंतरावरील पाइपलाइन १७० ‘एमएलडी’चीच असणार आहे. तीन वर्षांपासूनचा समांतर जलवाहिनीचा वाद आता संपुष्टात आला असून कोल्हापूरच्या ‘लक्ष्मी’ कंपनीने भरलेली अनामत रक्कम परत दिली जाणार आहे. त्या मक्तेदाराने यापुढे कोर्टात किंवा लवादात जाणार नाही, असेही त्यांनी लेखी दिले आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरकरांना नियमित पाण्याची आशा आहे.

‘अमृत’मधून ६३० कोटींचा प्रस्ताव

समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत अमृत योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ६३० कोटींच्या कामांचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल. त्या निधीतून शहरातील पाणीपुरवठ्याच्या टाक्या, नेटवर्क (अंतर्गत पाइपलाइन) बदलले जाणार आहे. जेणेकरून समांतर जलवाहिनीतून आलेले पाणी त्यातून सहजपणे, पुरेशा दाबाने नागरिकांना नियमित मिळणार आहे.

समांतर जलवाहिनीची स्थिती

  • एकूण अंतर

  • ११० किलोमीटर

  • कामाचा खर्च

  • ६१५ कोटी

  • कामाची मुदत

  • १८ महिने

  • पाइपलाइन क्षमता

  • १८० एमएलडी

प्रत्येक आठवड्याला घेणार कामाचा आढावा

अठरा महिन्यात समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर अगाऊ तीन महिन्यांच्या मुदतीत ही सिस्टिम सुरु करून द्यावी लागणार आहे. दरम्यान, हे काम सुरू असताना प्रत्येक आठ दिवसाला स्मार्ट सिटीचे सचिव आसिम गुप्ता व महापालिका आयुक्त शीतल उगले-तेली हे आढावा घेणार आहेत. बारचार्टप्रमाणे काम होते की नाही, यानुसार ते वॉच ठेवणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT