Ujjani Dam sakal
महाराष्ट्र बातम्या

खुशखबर, उजनी धरण प्लसमध्ये! ४५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यात धरण प्लसमध्ये; पुणे, सोलापुरातील मुसळधार पावसामुळे ३ दिवसांत धरणात आले १० टीएमसी पाणी

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण मे महिन्यात ४५ वर्षांत पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात (प्लसमध्ये) आले आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे २१ मे रोजी उणे २३ टक्क्यांवर पोचलेला उजनीतील पाणी पातळी उणे दोन टक्क्यांवर आली आहे. सहा दिवसांत उजनीत तब्बल १२ टीएमसी पाणी जमा झाले असून सध्या धरणात दौंड व धरण परिसरातून पाणी जमा होत आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण मे महिन्यात ४५ वर्षांत पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात (प्लसमध्ये) आले आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे २१ मे रोजी उणे २३ टक्क्यांवर पोचलेला उजनीतील पाणी पातळी उणे दोन टक्क्यांवर आली आहे. सहा दिवसांत उजनीत तब्बल १२ टीएमसी पाणी जमा झाले असून सध्या धरणात दौंड व धरण परिसरातून पाणी जमा होत आहे. त्यामुळे उद्या (मंगळवारी) दुपारी बारापर्यंत धरण प्लसमध्ये येईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनीतून शेतकऱ्यांसाठी सलग ६० दिवस दोन आवर्तने सोडावी लागली. याशिवाय सोलापूर शहरासाठी देखील भीमा नदीतून पाणी सोडावे लागले. त्यामुळे १८ एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा उणे पातळीत गेला होता. एका महिन्यांत धरणाची पातळी उणे २३ टक्के झाली होती. मॉन्सूनचे आगमन आणि जिल्ह्यातील यापूर्वीचा पाऊस, यामुळे धरणाची पातळी यंदा मेअखेर उणे ५० टक्क्यांपर्यंत खाली जाईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता. मात्र, मागील आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे उणे २३ टक्के झालेले उजनी धरण आता २७ मे रोजी प्लसमध्ये आले आहे. मे महिन्यात धरणाची पातळी प्लसमध्ये होण्याची ही ४५ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. धरणात सध्या दौंडवरून १९ हजार आणि धरण परिसरातील पावसाचा ११ हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे.

दोन दिवसांत धरणात ७.५४ टीएमसी पाणी

उजनी धरणात अवघ्या दोन दिवसात (२५ व २६ मे) धरणात साडेसात टीएमसी पाणी जमा झाले आहे. २५ मे रोजी उणे १६.९४ टक्के (५४.५८ टक्के) असलेले धरण २६ मे रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत उणे २.७३ टक्क्यांपर्यंत आले होते. त्यावेळी धरणात ६२.१२ टीएमसी पाणीसाठा होता. सध्याचा ३० हजाराचा विसर्ग असाच राहिल्यास पुढील १२ तासांत धरणात एक टीएमसीपेक्षा जास्त पाणी जमा होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT