महाराष्ट्र

गुगल मॅपमुळे चिनी पर्यटक जंगलात भरकटला 

सकाळ वृत्तसेवा

पाली : गुगल मॅपद्वारे अनेक जण नवीन ठिकाणाचा मार्ग शोधतात. मात्र, या गुगल मॅपमुळे चक्क एक चिनी पर्यटक भरकटल्याची घटना समोर आली आहे.

चीनमधून इफन सिंघराजा हा पर्यटक मंगळवारी (ता. 15) सुधागड तालुक्‍यातील ठाणाळे येथील प्रसिद्ध लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी आला होता. तो गुगल मॅपच्या साहाय्याने ठाणाळे जंगल परिसरात गेला. मात्र, या गुगल मॅपमुळे हा पर्यटक जंगलात भरकटला. 

वाट चुकलेल्या इफन सिंघराजाने अखेर आपल्या मित्रमंडळींना संपर्क करून आपण वाट चुकलो असल्याची माहिती दिली. मुंबईतील सहकारी मित्रांनी येथील शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या वेळी शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान सुधागडच्या कार्यकर्त्यांनी व स्थानिकांनी तत्काळ त्या पर्यटकाची दुपारी 4 वाजताच्या दरम्यान शोध मोहीम सुरू केली.

दरम्यान, इफन लेण्यांच्या वरच्या जंगलात पोहचला होता. सायंकाळी 7.30 नंतर लेण्यांच्या वर कड्या कपारीत शोधकर्त्यांना इफन सापडला. या वेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना पाहून इफनने सुटकेचा निश्‍वास सोडला. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी इफनला जंगलातून सुखरूप बाहेर काढले व ठाणाळे लेण्यांच्या पायथ्याशी आणले. त्यानंतर रात्री साडे दहा वाजता सर्वजण ठाणाळे गावात पोहचले. 


लग्नसमारंभासाठी आला होता भारतात


दरम्यान, इफन सिंघराजा याने शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. या वेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुजित बारसकर, पोलिस पाटील संजय बारसकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष अनिल वारंगे, ग्रामस्थ विजय वारंगे, राजेश खाडे आदी उपस्थित होते. इफन हा उत्तराखंड येथे एका लग्नासाठी आला आहे. हे लग्न पुढच्या महिन्यात असल्याने तोपर्यंत तो भारतात विविध ठिकाणी फिरत आहे. 


अशा अनोळखी ठिकाणी व जंगल परिसरात जाताना स्थानिक लोकांना सोबत घ्यावे किंवा संपूर्ण परिसराची नीट माहिती करून घ्यावी. केवळ तंत्रज्ञानावरच अवलंबून राहू नये, नाहीतर मोठा बाका प्रसंग ओढवू शकतो. प्रत्येकाने ही खबरदारी आवश्‍य घ्यावी. 
सुजित बारसकर, कार्याध्यक्ष, शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान, सुधागड 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT