महाराष्ट्र बातम्या

"बोलघेवड्या आव्हाडांना बहुजनांच्या पोरांशी देणं घेणं नाही"

म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने परीक्षार्थी संतप्त.

सुधीर काकडे

राज्यात आतापर्यंत वेगवेगळ्या नोकर भरतीच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता पुन्हा एका नवं प्रकरण समोर आलंय. म्हाडाकडून (MHADA) आयोजित केली गेलेली ५६५ जागांसाठीची परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यावरून आता भाजपने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या गृहनिर्माण विभागाच्या आणि महाविकास आघाडीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली.

प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा दर आठवडायाला एक्सेल शीट मध्ये न चुकता हिशोब घेतात. पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही असा आरोप पडळकरांनी केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, आव्हाड स्वतःच मागील आठवड्याभरापासून म्हाडाचे नोकर भरती परिक्षामध्ये घोटाळे होणार आहेत, त्यात बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यातून आवाहन करत होते. त्यामुळे जर त्यांना घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे आहे, तरी सुद्धा त्यांना मध्यरात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस आहे. एक एक पै गोळा करून परिक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी त्यांना काहीही देणंघेणं नाही असा गंभीर आरोप पडळकरांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ५०% कर्मचारी WFH वर, आठवड्यातून 2 दिवस Virtual Hearing; मोदींच्या आवाहनानंतर मोठा निर्णय

मुलासमोर नो टीव्ही पॉलिसी, आठ वाजता झोपायचं; गश्मीर महाजनीने मुलासाठी बनवलेत कडक नियम, शाळेत डब्बाही...

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

Maharashtra Latest News Live : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली, प्रवीण पडवळ यांची नियुक्ती

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

SCROLL FOR NEXT