Padalkar Criticize Ajit Pawar Over ST Merger esakal
महाराष्ट्र बातम्या

'अजित पवार मोठेपणा थांबवा, तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही'

एसटी कर्मचाऱ्यांच्या विनाशाला अजित पवारच कारणीभूत, पडळकरांचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

एसटी कर्मचाऱ्यांच्या विनाशाला अजित पवारच कारणीभूत, पडळकरांचा हल्लाबोल

अजित पवारांच्या बोलण्याला सरकारमध्ये काडीचीही किंमत नाही, त्यांनी मोठेपणा थांबवावा असा हल्लाबोल भाजपाचे गोपिचंद पडळकर यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकावर ताशेरे ओढले.

यावेळी पडळकर म्हणाले, मागच्या वेळीही उपमुख्यमंत्र्यांनी खोटेपणा केला आहे. ते एसटी मंडळातील वाझे आहे. एसटी संघटना पवार साहेबांची आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम सुरु आहे. न्यायालयाने मान्यताप्राप्त एसटी कर्मचाऱ्यांची नोंदणी रद्द केली. मात्र अजित पवारांना खासगी भरती करायची आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विनाशाला तेच कारणीभूत असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, एसटी महामंडळाचं ते गोपनीयतेचं पत्र आहे. ते पत्र बाहेर न आल्यास माहिती कशी मिळणार? पत्र चुकीचं असल्यानं अधिकारीही उघडे पडले आहेत. बेकायदेशीर संपात अरणारे कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतरही काळेंना एसटी महामंडळात ठेवलं आहे. माधव काळेची उचलबांगडी करा. तो पैसे वसूल करणारा एजंट आहे, असेही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT