devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात सत्तांतर अटळ; फडणवीसांचं सूचक वक्तव्य

सिंहगर्जना करुन गोव्यात गेलेल्या पक्षांचा दारून पराभव झाला, फडणवीसांचा टोला

सकाळ डिजिटल टीम

सिंहगर्जना करुन गोव्यात गेलेल्या पक्षांचा दारून पराभव झाला, फडणवीसांचा टोला

राज्यातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून भाजपाने यात मुंसडी मारली आहे. त्यामुळे आज राज्यात भाजपाकडून ठिकठिकाणी आनंदोत्सन साजरा करण्यात येत आहे. गोवा विधानसभेत प्रभारी म्हणून काम पाहिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईतही जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, सिंहगर्जना करुन गोव्यात गेलेल्या पक्षांचा दारून पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया देत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोला लगावला आहे. याशिवाय २०२४ ला महाराष्ट्रातही सत्तांतर अटळ असल्याचं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, सामान्य माणसांच्या मनात पंतप्रधान मोदी आहेत. त्यांचे काम, नेतृत्वाला सामान्यांनी दाद दिली आहे. त्यामुळे भाजप हा विजयाचा झेंडा फडकवू शकले. देशातील नागरिक भाजपाच्या पाठीशी आहेत. आमचा हा जल्लोष आतापुरता आहे. आज रात्रीपासून आम्ही पुन्हा कामाला लागणार आहोत. कारण अजून लढाई बाकी असून आम्हाला कर्तव्यांची जाणिव आहे. राज्यात युवा, महिला, शेतकरी, मजुर, मराठा आरक्षण, वेगवेगळे घटकांना न्याय द्यावा लागले, उद्यापासून तीच तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातल्या जनेता हुशार आहे. म्हणून त्यांनी योग्य नेतृत्वाचा कौल दिला आहे. नोटापेक्षा शिवसेना राष्ट्रवादीला कमी मत मिळाली आहेत. यावर त्यांनी आत्मचिंतन करावं. येत्या २०२४ च्या निवडणुकीत मात्र महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी यावेळ केलं आहे. आता मुंबई महापालिकेसाठी आम्ही तयारी सुरु करणार आहोत. महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करायचे असून केंद्राच्या अजेंड्यावर राज्याचा विकास होईल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही ते म्हणाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांचं राज्य! ODI World Cup मध्ये दिसणार बदलाचे वारे; ICC च्या ऐतिहासिक निर्णयाचे जगभरातुन कौतुक

Panchayat Raj : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’; गावाच्या विकासासाठी आता मोठी संधी!

Latest Marathi News Updates Live : इचलकरंजीत पाणी प्रश्नावर महाविकास आघाडी आक्रमक

Kalyani Komkar Statement: वनराजच्या डेड बॉडीवर हात ठेवून सांगितलं होतं... आयुष कोमकरच्या आईने काय सांगितलं? Exclusive माहिती

Chhagan Bhujbal: नातेवाईक की नातेसंबंध? दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे; भुजबळांनी सगळं उलगडून सांगितलं

SCROLL FOR NEXT