Government changed in Maharashtra system remains same Chandrasekhar Rao Meeting of BRS workers injustice to farmers sakal
महाराष्ट्र बातम्या

K.Chandrashekar: 'लोक चंद्र, तारे मागत नाही...'; फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातून चंद्रशेखर राव बरसले

चंद्रशेखर राव ः बीआरएस कार्यकर्त्यांचा मेळावा, शेतकऱ्यांवर अन्याय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्रातील जनतेने सर्वच प्रमुख पक्षांना सत्तेवर बसवले आहे. येथे सत्तेतील माणसे बदली मात्र व्यवस्था तीच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्याही कमी झाल्या नाहीत. दलितांवरील अन्यायही दूर झाला नाही. त्यामुळे आम्हाला एक संधी द्या, असे आवाहन भारत राष्ट्र समितीचे नेते व तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी येथे केले.

सुरेश भट सभागृहात आयोजित पक्षाच्या पहिल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. तेलंगणमध्ये शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मोफत दिली जात आहे. जागोजागी धरणे बांधून पाण्याची व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतमाल राज्य सरकारमार्फत खरेदी केला जातो.

शेतकऱ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबीयांच्या खात्यात पाच लाख रुपये जमा केले जातात. त्यामुळे अल्पावधीतच देशात सर्वाधिक धान आता तेलंगणात पिकवले जात आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी आहेत. आत्महत्या जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

अनेक उद्योग निर्माण झाल्याने रोजगारही वाढला आहे. याकरिता आम्ही सर्वप्रथम तलाठी हटवले. सातबारासह सर्व जमिनीच्या नोंदीचे डिजिटायझेशन केले. त्यामुळे आता कोणालाच सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत नसल्याचा दावा यावेळी चंद्रशेखर राव यांनी केला.

देशात एकच धंदा

निवडणुका जिंकणे हा एकच धंदा देशात सुरू आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात सत्ताबदल झाला. मात्र, परिवर्तन कुठे झाले? होणार की नाही याची कोणालाच शाश्वती नाही. लोक चंद्र, तारे मागत नाही. त्यांना फक्त पाणी, वीज आणि रोजगार हवा आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक नद्या वाहतात. तरीही चार-दोन शहरे सोडले तर सर्वत्र पाणी टंचाई आहे. सर्वाधिक पुरोगामी, विकसित असल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात. हे चित्र बदलायचे असेल तरी बीआरएसला निवडून द्या, असेही चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

T20 WC, IND vs ENG SF: अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात गेला, संजू सॅमसन म्हणालेला, अरे घाई नको करू... ! इंग्लंडच्या रणनीतीने हैराण

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : इस्रायलकडून इराणवर मोठे ड्रोन हल्ले

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

SCROLL FOR NEXT