vijay wadettiwar
vijay wadettiwar 
महाराष्ट्र

सरकारी जाहिरातीत बनवाबनवी

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षांत फसवणुकीचा उद्योग करून जनतेची दिशाभूल केली आहे. आताही जाहिरातबाजीत त्यांनी खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे. आरोग्य विभागाच्या जाहिरातीत त्यांनी दिलेली माहिती सपशेल खोटी आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सरकारी जाहिरातबाजीचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, ‘‘सरकारची पाच वर्षांतील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची असून, कोणताही घटक समाधानी नाही. असे असताना ‘सर्वोत्तम कामगिरी, महाराष्ट्र मानकरी’ या जाहिरातीतून आपल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे. आरोग्य विभागाच्या पानभर जाहिरातीमध्ये बाईक ॲम्ब्युलन्स सेवेमुळे ‘आरोग्यदायी झेप’ घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा करताना दिलेली आकडेवारी वस्तुस्थितीला धरून नाही. ऑगस्ट २०१७ रोजी मुंबईत १० बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली. मेळघाट, पालघर, गडचिरोली या दुर्गम भागातही सेवेचा विस्तार करण्यात आला. पण, सरकारचा कालावधी संपत आला, तरीही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचेच सांगितले आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT