Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: सरकारच्या निर्णयांचा पाऊस! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दीड तासात १९ हजार कोटींच्या खर्चाला मान्यता

सकाळ डिजिटल टीम

मुंबई, ता.२८ : ‘गतिमान सरकार, वेगवान निर्णय’ असं ब्रीदवाक्य घेऊन चाललेल्या शिंदे सरकारने आज निर्णयांचा पाऊस पाडला.

केवळ दीड तासाच्या मंत्रिमंडळ बैठकीत तीसहून अधिक प्रस्तावांना मान्यता देत तब्बल १९ हजार ३०० कोटींच्या खर्चाला मंजूरी दिली.

वैयक्तिक लाभाच्या योजनांसह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीचा यात समावेश असून, आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून मजबूत पाय रोवण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

राज्यातील वंचित व उपेक्षित वर्गासह अनेक जिल्ह्यांत विविध योजना व अस्थापनांच्या उभारणीच्या निर्णयाला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

विविध विभागांचे तब्बल चाळीसच्या आसपास प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर आले होते. यापैकी ३१ प्रस्तावांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली.

राज्यात विविध शहरात ‘आपला दवाखाना’ साठी २१० कोटींची तरतूद करतानाच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेसाठी गावखेड्यातील वंचित वर्गासाठी दरमहा ५०० रुपयांची वाढ करत दोन कोटीहून अधिक लाभार्थ्यांना आपलं करण्याचा सरकारने प्रयत्न केला.

याशिवाय, ‘गाळमुक्त नदी अन् गाळयुक्त शिवार’ या धोरणाखाली नदीतील गाळ उपसा करण्यासाठी तब्बल ६०३४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत तब्बल १२ कोटी जनतेला पाच लाखांपर्यंतचे आरोग्य कवच जाहीर करत शिंदे सरकारने ‘षटकार’ खेचल्याचे मानले जाते. आता अंमलबजावणीसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT