रोजगार हमी e sakal
महाराष्ट्र बातम्या

रोजगार हमी योजना; अधिकारी तुपाशी कर्मचारी उपाशी

सरकारने केवळ पूर्णवेळ काम करणाऱ्या मोजक्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन वाढविले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या माध्यमातून गावा-गावांत रोजगार हमीची कामे वाढविण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी झोकून देणाऱ्या रोजगार हमीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वाढीव मानधन मिळेनासे झाले आहे. सरकारने केवळ पूर्णवेळ काम करणाऱ्या मोजक्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन वाढविले आहे. त्यामुळे अधिकारी तुपाशी आणि कंत्राटी कर्मचारी उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे वाढीव मानधन त्वरित द्यावे, या मागणीसाठी येत्या मंगळवारपासून (ता.१५) कामकाज बंद आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्यावतीने विद्या चोरगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार यांना निवेदन दिले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्वरित वाढीव मानधन न दिल्यास, येत्या मंगळवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा चोरगे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.

रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन लागू करण्यात यावे, मानधनवाढीबाबत घेतलेल्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी सुरु झालेली नाही. हे वाढीव मानधन त्वरित देण्यात यावे, मानधनातील तफावत दूर करून, आतापर्यंतचा फरक देण्यात यावा, ॲपवरील आॅनलाइन हजेरी रद्द करावी, मानधनात दरवर्षी किमान आठ टक्के वाढ करावी आणि याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात यावा, अंगणवाडीसेविका आणि आशा स्वयंसेविकांच्या धर्तीवर ग्राम रोजगार सेवकांचे मानधन निश्‍चित करण्यात यावे, ग्राम रोजगार सेवकांना प्रवास भत्ता देण्यात यावा.

ग्राम रोजगार सेवकांच्या नियुक्ती ही पूर्णवेळ व प्रशासकीय करण्यात यावी, ग्राम रोजगार सेवकांसाठी पीएफची सुविधा उपलब्ध करून द्यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, प्रत्येकी १० लाख रुपयांचा आरोग्य विमा कवच देण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी हे कामकाज बंद आंदोलन करण्यात येत असल्याचे विद्या चोरगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : दौंड–इंदापूरमध्ये बनावट मद्याचा भंडाफोड; तीन लाखांचा साठा जप्त; तीन तरुणांना अटक!

Latest Marathi News Update LIVE : ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा

Sangli News: नाराजांसह बंडाची तयारी करणाऱ्यांची मनधरणी सुरु; ‘पॅचअप’साठी बैठकांचे सत्र; अनेक नाराजांकडून पक्षांतराची घोषणा

Balapur Crime : तुरीच्या शेतात धक्कादायक घटना: जळालेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह सापडताच परिसरात खळबळ!

Ichalkaranji News: इच्छुकांची धाकधूक वाढली; महापालिका निवडणुकीची अनिश्‍चितता, हालचालींना ब्रेक

SCROLL FOR NEXT