Loksabha Election 2024 Esakal
महाराष्ट्र बातम्या

शासकीय कर्मचाऱ्यांना अंगलट येईल प्रशिक्षणाची दांडी! निवडणुकीतील प्रशासनाचा आदेश पाळावा लागेल, अन्यथा गैरहजर कर्मचाऱ्यांवर होईल निलंबनाची कारवाई

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमधील 20000 कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे. मतदानापूर्वी कर्मचाऱ्यांचे तीनवेळा प्रशिक्षण होणार आहे. कामावेळी परस्पर गैरहजर राहिलेल्यांवर शिस्तभंगाची, निलंबनाची कारवाई होवू शकते. तसेच गुन्हाही दाखल होवू शकतो.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमधील २० हजार कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे. मतदानापूर्वी त्या कर्मचाऱ्यांचे तीनवेळा प्रशिक्षण होणार आहे पण, पहिल्याच प्रशिक्षणावेळी जवळपास दीड हजार कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांचे प्रशिक्षण आता दोन दिवसांत संबंधित तहसीलदारांच्या माध्यमातून पार पडेल. पण, निवडणुकीच्या कामावेळी परस्पर गैरहजर राहिलेल्यांवर शिस्तभंगाची, निलंबनाची कारवाई होवू शकते. तसेच पोलिसांत गुन्हाही दाखल होवू शकतो, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरवात झाली आहे. तीन दिवसांपूर्वी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटच्या मशिन सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पोच करण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडला आहे. आता दुसरा टप्पा एप्रिलअखेर होणार आहे. मतदानापूर्वी आदल्यादिवशी प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा पार पडणार असून त्याच दिवशी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य ताब्यात दिले जाणार आहे. पहिल्या प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांना आता संबंधित तालुक्याचे तहसीलदार प्रशिक्षण देतील. पण, पुढील दोन्ही प्रशिक्षणाला सर्वच कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

दरम्यान, काही कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील दोन आदेश प्राप्त झाले असून त्या कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाला ज्याठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी काम करावे लागणार आहे. बीएलओ म्हणून काम करणाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेसंबंधीचे काम नसणार आहे. पण, त्यांनाही आदेश वितरित झाले आहेत. त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांची संख्या मोठी दिसत आहे. ७ मे रोजी माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता कोणत्याही कर्मचाऱ्याची गैरहजेरी चालणार नाही असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कर्मचारी प्रशिक्षणाचे टप्पे

  • २६ ते २९ एप्रिल रोजी प्रशिक्षण

  • ६ मे रोजी शेवटचे प्रशिक्षण

  • मतदान साहित्य वाटप ६ एप्रिल रोजीच

...त्या गैरहजर कर्मचाऱ्यांवर होवू शकते शिस्तभंग, निलंबनाची कारवाई

जिल्ह्यातील तीन हजार ६१७ केंद्रांवर मतदान पार पडणार असून प्रत्येक केंद्रावर चार-पाच कर्मचारी नेमले आहेत. निवडणूक ड्यूटी असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे आवश्यक आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग, निलंबन, विभागीय चौकशीची कारवाई होवू शकते. एखाद्यावेळी गुन्हा देखील दाखल होवू शकतो.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

जिल्ह्यातील निवडणूक आघाडीवर

  • लोकसभा मतदारसंघ :

  • एकूण विधानसभा : ११

  • एकूण मतदान केंद्र : ३,६२७

  • कर्मचारी प्रशिक्षणाचे टप्पे :

  • एकूण कर्मचारी : २०,०००

  • प्रशिक्षणाला गैरहजर : १,५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT