Government of Maharashtra will honor the students who have succeeded in UPSC
Government of Maharashtra will honor the students who have succeeded in UPSC 
महाराष्ट्र

नाना पटोलेंची संकल्पना; युपीएससीतील ‘या’ यशस्वी विद्यार्थ्यांचा सरकार करणार गौरव

अशोक मुरुमकर

अहमदनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाले. मोठ्या कष्टाने यश मिळवलेल्या या विद्यार्थ्यांचा पहिल्यांदाच महाविकास आघाडी सरकार गौरव करणार आहे.

सप्टेंबर महिन्यात केंद्रील लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मुलाखती झाल्या होत्या. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात युपीएससीने मेरीट लिस्ट प्रसिद्ध केली होती. त्यात महाराष्ट्रातील ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवले होते. या परिक्षेत महाराष्ट्रातील नेहा भोसले ही देशात १५ वा तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. 

‘कोरोना'मुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊन काळात मुलाखतींचे वेळपत्रक विस्कळीत झाले होते, मग 'यूपीएससी'ने पुन्हा एकदा वेळापत्रक जाहीर करून उमेदवारांच्या आरोग्याची काळजी घेत मुलाखती पूर्ण केल्या होत्या. यामध्ये ८२९ जणांची निवड यादी जाहीर केली होती. 

विधानसभेच्या अध्यक्ष नाना पटोले यांच्या संकल्पनेतून महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा मंगळवारी २५ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता विधानमंडळामार्फत गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंस विविध मान्यवर राहणार उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील विधानभवनात हा गौरव सोहळा होणार आहे. या गौरवामुळे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.

या निकालात १८० आयएएस, २४ आयएफएस, १५० जणांची आयपीएस म्हणून निवड झाली. तर सेंट्रल सिव्हिल ग्रुप ए साठी ४३८ व ग्रुप बी साठी १३५ जणांची निवड करण्यात आली आहे. या निकालात खुल्या गटातून ३०४, इडब्लूएस ७८, ओबीसी २५१, एससी १२९ , एसटी ६७ उमेदवार निवडले गेले.

यांनी फडकावला मराठी झेंडा (कंसात रँक ) 
नेहा भोसले (१५), मंदार पत्की (२२), आशुतोष कुलकर्णी (४४) , प्रियंका किशोरे( ६१) , योगेश पाटील (६३), विशाल नरवडे (९१) ,  राहुल चव्हाण (१०९),  कुलदीप जंगम (१३५), नेहा देसाई (१३७), जयंत मंकाळे (१४३), अभयसिंग देशमुख (१५१), अश्विनी वाकडे (२००), सागर मिसाळ (२०४), महादेव गित्ते (२१०), कुणाल चव्हाण (२११), सचिन हिरेमठ (२१३),  सुमीत महाजन (२१४), सारांश महाजन (२२४), अविनाश शिंदे ( २२६), शंकर गिरी (२३०), श्रीकांत खांडेकर (२३१), योगेश कापसे (२४९), गौरी पुजारी (२७५), प्रसाद शिंदे (२८७), आदित्य काकडे (३८२) निमीश पाटील (३८९), मयांक स्वामी (३९३), महेश गिते (३९९), कांतीलाल पाटील (४१८)  स्वप्नील पवार ( ४४८), ऋषिकेश देसाई (४८१), नवनाथ माने (५२७), प्रफुल्ल देसाई (५३२), विजयसिंहगराव गिते(५५०), समीर खोडे (५५१), सुरेश शिंदे (५७४), अभिनव इंगवले (६२४), प्रियंका कांबळे (६७०) निखील खरे (६८७), सौरभ व्हाटकर (६९५), अक्षय भोसले (७०४), अभिजीत सरकाते (७१०), प्रज्ञा खंदारे (७१९), संकेत धनवे (७२७), शशांक माने (७४३), निखील कांबळे (७४४), राहूल राठोड (७४५), सुमीत  रामटेके (७४८), निलेश गायकवाड (७५२), कुणाल सरोटे (७६५), अभय सोनकर (७६७) वैभव वाघमारे (७७१), सुनील शिंदे (८१२), हेमंत नंदनवार (८२२), स्वरूप दीक्षित (८२७) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT