Omicron Variant
Omicron Variant  esakal
महाराष्ट्र

Omicron: मेडिकल काॅलेजच्या 56 विद्यार्थिनींना ओमिक्रॉनची लागण

सकाळ वृत्तसेवा

मिरज : येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या ५६ विद्यार्थिनींना ओमिक्रॉनची (Omicron) लागण झाली असल्याचे रविवारी (ता. ९) स्पष्ट झाले. दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Delhi Indian Council Medical Research Student)या संस्थेमध्ये तपासणीसाठी पाठवलेल्या या विद्यार्थिनींच्या नमुन्यांचा अहवाल काल महाराष्ट्र सरकारच्या विशेष विभागास प्राप्त झाला. त्यामध्ये त्यांच्यात ओमिक्रॉनची लक्षणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थिनींच्या नमुन्यांचा अहवाल महाराष्ट्र सरकारच्या विशेष विभागास प्राप्त झाला.

यामध्ये पुणे येथील प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीत एकाही विद्यार्थिनीला ओमिक्रॉनची लागण झाले नसल्याचे स्पष्ट झाले; परंतु दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेत झालेल्या तपासणीत मात्र ५६ विद्यार्थिनींना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

याबाबतचा अधिकृत अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेकडून राज्य सरकारच्या विशेष कक्षास पाठविण्यात आला आहे. याबाबतच्या अधिकृत सूचना रात्री उशिरा मिरज वैद्यकीय महाविद्यालयास प्राप्त झाल्या. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने तातडीने या ५६ विद्यार्थिनींना पुन्हा वेगळे करून त्यांच्यावरील उपचारांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. याशिवाय हा परिसर प्रतिबंधित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT