This Government offices do not have five days a week 
महाराष्ट्र बातम्या

'या' सरकारी कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा नाही

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारचा सरकारी कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय येत्या 29 फेब्रुवारीपासून लागू होत आहे. परंतु अत्यावश्‍यक सेवा तसेच कारखाना किंवा औद्योगिक अधिनियम लागू असलेल्या कार्यालयांसह शाळा, सरकारी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, पोलिस दल, अग्निशमन दल आणि सफाई कामगारांना पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही. याबाबतचे स्पष्टीकरण सोमवारी (ता. 24) अध्यादेशाद्वारे करण्यात आले आहे. 

पुणे : पिरंगुटमध्ये दुकानांना भीषण आग; जीवितहानी नाही

सरकारी कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यामुळे त्यांना आता सर्व शनिवारी आणि रविवारी सुटी राहील. परंतु सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर, शिपायांसाठी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत वेळ राहील. दुपारी एक ते दोन या वेळेतील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुटी राहील. 

अरे बापरे! मानाच्या विड्यासाठी मोजले तब्बल ३० लाख! कोठे ते पहा?

ज्या कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू नाही, अशा कार्यालयांची नावे : 
जलसंपदा विभाग : दापोडी, सातारा आणि वर्धा येथील कर्मशाळा, अकोला, नगर, आष्टी, खडकवासला, नाशिक आणि नांदेड येथील प्रादेशिक कर्मशाळा, जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत क्षेत्रीय प्रकल्पावरील आस्थापना, रोजंदारी आस्थापनांवरील क्षेत्रीय कर्मचारी. 
सार्वजनिक आरोग्य विभाग : व्हॅक्‍सिन इन्स्टिट्यूट नागपूर 
महसूल व वन विभाग : बल्लार शहा, परतवाडा आणि डहाणू येथील एकात्मिकृत घटक आणि वर्कशॉप, अल्लापल्ली येथील सरकारी मालकीची सॉ मिल आणि पुण्यातील सरकारी छायाचित्र नोंदणी कार्यालय 
सामान्य प्रशासन विभाग : सरकारी परिवहन सेवेचा कारखाना विभाग 
कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्य व्यवसाय विभाग : दुग्धशाळा विकास विभागांतर्गत कारखाना अधिनियम लागू असलेल्या दुग्ध योजना 
उद्योग, उर्जा व कामगार विभाग : सरकारी मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयांतर्गत येणारी मुद्रणालये 
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील औद्योगिक प्रशिक्षण संस्था 
अत्यावश्‍यक सेवा : सरकारी रुग्णालय, पोलिस कारागृह, पाणीपुरवठा प्रकल्प-योजना, अग्निशमन दल आणि सफाई कामगार 
शैक्षणिक संस्था : शाळा, सरकारी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि तंत्रनिकेतन 

फक्त मौज-मजेसाठी 'त्यांनी' चोरल्या 25 दुचाकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

#MyModiStory कशी झाली होती फडणवीस आणि मोदींची पहिली भेट? कार्यक्रम आयोजक ते मुख्यमंत्री...

ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः करा फाईल

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

Ashok Saraf : "वक्ख्या विक्खी वुख्खू" फेम अशोक मामांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार जाहीर, लवकरच कोल्हापुरात सोहळा

SCROLL FOR NEXT