तात्या लांडगे
सोलापूर : राज्यातील अंशत: अनुदानित शाळांवरील ५२ हजार २७६ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी १ ऑगस्टपासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले आहे. २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार पटसंख्या व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे ग्राह्य धरली जाणार आहेत. पटसंख्या कमी झाल्यास पदे कमी करण्यात येणार असून ते अधिकार शिक्षण संचालकांना असणार आहेत. टप्पा अनुदान घेणाऱ्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती ‘बायोमेट्रिक’ प्रणालीत नोंदविली जात असल्याची खात्री करावी. तीन महिन्यांचा डीजीटल रेकॉर्ड बंधनकारक आहे. अट पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, पण अटींचे पालन न करणाऱ्या शाळांचे अनुदान रोखण्याचे अधिकार शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
ठळक बाबी...
२० टक्क्यांवरील २०७९ शाळा, ४१८३ तुकड्यांवरील १५ हजार ८५९ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ३०४ कोटींचे अनुदान
४० टक्क्यांवरील १७८१ शाळा व २५६१ तुकड्यांवरील १३ हजार ९५९ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २७६ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर
६० टक्के अनुदानावरील एक हजार ८९४ शाळा व २१९२ तुकड्यांवरील १९ हजार ७४४ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ३४१ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी
किती शाळा अन् तुकड्यांना अनुदान...
२० टक्के अनुदानावरील २०२ प्राथमिक शाळा व १५४९ तुकड्यांवरील दोन हजार ७२८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, २७२ माध्यमिक शाळा व ११०४ तुकड्यांवरील पाच हजार २५४ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि एक हजार ६०५ कनिष्ठ महाविद्यालये व १५३० तुकड्यांवरील सात हजार ८७७ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव २० टक्के (३०४ कोटी रुपये) अनुदान मिळणार आहे.
४० टक्के अनुदानावरील २१२ प्राथमिक शाळा व ७३८ तुकड्यांवरील दोन हजार ३८ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, २२४ माध्यमिक शाळा व ३१० तुकड्यांवरील दोन हजार ८६६ आणि एक हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालये व १५१३ तुकड्यांवरील नऊ हजार ५५ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी देखील २० टक्के वाढीव अनुदान मिळणार आहे. त्यासाठी २७६ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
६० टक्के अनुदानावरील ४०६ प्राथमिक शाळा व १२२६ तुकड्यांवरील ३८३६ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, १४८८ माध्यमिक शाळा व ९६६ तुकड्यांवरील १५ हजार ९०८ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ३४१ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
नव्याने २० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या ८१ प्राथमिक शाळा व ५०५ तुकड्यांवरील ८९० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ८१ माध्यमिक शाळा व ११५ तुकड्यांवरील १०८३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि ६९ कनिष्ठ महाविद्यालये आणि ७५ तुकड्यांवरील ७४१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी देखील ४८ कोटी ३२ लाखांचा निधी मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.