wine 
महाराष्ट्र बातम्या

फ्रूट वायनरी उद्योजकांना दिलासा; एक रुपयाच उत्पादन शुल्क

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील फ्रूट वायनरी उद्योजकाला भरावा लागणार प्रती बल्क लिटर उत्पादनाला आता नाममात्र एक रुपयाचं उत्पादन शुल्क भरावे लागणार आहे. तसा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

फळ व मीड वाईनच्या उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या व्यवसायांकडून द्राक्ष व्यतिरीक्त सर्व वाईन्स व मीड वाईन्सवर प्रती बल्क लिटर उत्पादनाला नाममात्र एक रुपया उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन दिल जाणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील फळ उत्पादकांना होणार आहे. या निर्णयात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व फळांचा उत्पादन कोकण पट्टयात मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यामुळे या भागातील फलउत्पादकाला निश्चितच याचा फायदा होईल.

द्राक्षाव्यतिरिक्त सर्व वाइन्स व मीड वाईन्सवर उत्पादन खर्चाच्या 100 टक्के उत्पादन शुल्क आकारण्यात येत होतं. याचा थेट परिणाम म्हणून इतर सौम्य मद्याच्या तुलनेत (बीअर व वाईन्स) या वाईन्स व मीड्स बऱ्याच महाग मिळतात. त्याचा परिणाम हा थेट विक्रीवर होत होता. बीअरच्या एका 330 मि.ली बाटलीची किंमत साधारण 150 ते 180 आहे. तर 750 मि.ली ची साधारण टेबल वाईन 250 ते 400 रुपये या दराने बाजारात मिळते. या तफावतीचा परिणाम म्हणून हे वायनरी उद्योग दर महिना केवळ 700 ते 800 पेट्या महाराष्ट्रात विकू शकत होते. शिवाय गेल्या 2 वर्षात या उद्योगात केवळ 4 नवीन उद्योजक जोडले गेले आहेत. त्यामुळे या वाईन उद्योगास चालना मिळण्याकरीता तसेच सं‍बंधित शेतकरी व आदिवासींना प्रोत्साहन देण्याकरीता उत्पादन शुल्क विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार इतर फळांपासून तयार होणाऱ्या मद्याच्या उत्पादनाला चालना मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

SCROLL FOR NEXT