Maratha Reservation Shahu Chhatrapati Maharaj esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : घटनादुरुस्तीशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे तितकंच खरं; शाहू छत्रपती महाराजांचं मोठं विधान

'घटनादुरुस्तीशिवाय ते मिळणार नाही, हे तितकेच खरे आहे.’

सकाळ डिजिटल टीम

'आरक्षण कसे द्यावे, यातला मी तज्ज्ञ नाही. लोकांना योग्य मार्गदर्शन करणे नेत्यांचे कर्तव्य आहे.'

कोल्हापूर : सरकार मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) कसे देणार, हे कळायला हवे, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी व्यक्त केली. नवीन राजवाडा (न्यू पॅलेस) येथे गणेश प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने (Kolhapur Ganeshotsav) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘आरक्षण कसे द्यावे, यातला मी तज्ज्ञ नाही. लोकांना योग्य मार्गदर्शन करणे नेत्यांचे कर्तव्य आहे. आरक्षण मिळणार असेल किंवा नसेल तर स्पष्ट सांगावे. लोकांना झुलवत ठेवणे योग्य नाही. आरक्षणाविषयी सरकारच्या (Maharashtra Government) मनात काय आहे, हे मला माहीत नाही. ते कशातऱ्हेने आरक्षण देणार, हे सर्वांना कळायला हवे. घटनादुरुस्तीशिवाय ते मिळणार नाही, हे तितकेच खरे आहे.’

संसद एक असे स्थान आहे, जिथे सर्वांना विचार व्यक्त करता येतात. चर्चाही करता येते. जेणेकरून सर्वांना लोकांसाठी, देशासाठी चांगले निर्णय घेता येतात. देशात १९५० पासून घटना अस्तित्वात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंहाचा वाटा उचलून घटना तयार केली.

त्यात संसद महत्त्वाची आहे. आता मी सिव्हिल कोर्ट सुरू करण्याबाबत ऐकतोय; पण त्यावर चर्चा झाली पाहिजे. एखाद्या पक्षाला बहुमत असेल, तर ते पास होणार हे खरे असले तरी चर्चा होणे अपेक्षित असल्याचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT